वाळूचोरी करणाऱ्या दोघांना ६ महिने हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:22 IST2021-04-04T04:22:45+5:302021-04-04T04:22:45+5:30

रणजीत सिद्धेश्वर थिटे (रा. संतपेठ, पंढरपूर) हा त्याच्या साथीदारांसह शहरातील हद्दीतील वाळूचोरी करत असतो. त्याला अटक करूनसुद्धा त्याला कायद्याचा ...

Two sand thieves were deported for 6 months | वाळूचोरी करणाऱ्या दोघांना ६ महिने हद्दपार

वाळूचोरी करणाऱ्या दोघांना ६ महिने हद्दपार

रणजीत सिद्धेश्वर थिटे (रा. संतपेठ, पंढरपूर) हा त्याच्या साथीदारांसह शहरातील हद्दीतील वाळूचोरी करत असतो. त्याला अटक करूनसुद्धा त्याला कायद्याचा धाक राहिलेला नाही. तो वाळूचोरी करून स्वतःच्या व साथीदारांच्या गरजा पुरवत होता. त्याच्या टोळीविषयी लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात दहशत आहे. सध्या त्याची गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांमध्ये भर पडलेली आहे आणि त्याच्यावर केलेली कारवाई अपुरी झाली आहे. त्याच्यावर तो किनी सार्वजनिक शांतता अबाधित ठेवणेदेखील अवघड झाले आहे. तिच्याकडून शासकीय मालमत्तेेस होणाऱ्या नुकसानीस प्रतिबंध करणे शक्य होणार नाही. यामुळे टोळीप्रमुख रणजित सिद्धेश्वर थिटे (रा. संतपेठ, पंढरपूर) व विकास महादेव बंदपट्टे (रा. महात्मा फुले चौक, पंढरपूर) यांना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, माढा, बार्शी या तालुक्यातून सहा महिन्यांसाठी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१चे कलम ५५प्रमाणे हद्दपार करण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

Web Title: Two sand thieves were deported for 6 months