सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलीस निलंबित, तिघांची बदली मुख्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:19 PM2020-08-06T13:19:29+5:302020-08-06T13:20:37+5:30

मंगळवेढा कारागृहातील कै दी पलायन प्रकरण; १५ दिवसांत मंगळवेढ्यातील चार पोलीस निलंबित

Two policemen from Solapur rural police force suspended, three transferred to headquarters | सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलीस निलंबित, तिघांची बदली मुख्यालयात

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलीस निलंबित, तिघांची बदली मुख्यालयात

Next
ठळक मुद्देकैदी पलायनप्रकरणी दोघांना निलंबित, तिघांना पोलीस मुख्यालयात बदलीचे आदेश निष्काळजीपणामुळे १५ दिवसात चौघांना निलंबित व्हावे लागले

मंगळवेढा : मंगळवेढा येथील सबजेलमधून तीन कोरोना पॉझिटिव्ह आरोपींनी पलायन केले होते. यावेळी कारागृहात ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाºयांनी कर्तव्यात कसूर केली म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागनाथ डबरे, नामदेव कोळी या दोन पोलीस कर्मचाºयांना निलंबित केले तर अजित सुरवसे, अजित मिसाळ, अनिल दाते या तीन पोलीस कर्मचाºयांची पोलीस मुख्यालयात बदली केली आहे. 

मंगळवेढा उपकारागृहातून २० जुलै रोजी पहाटे ४ वाजता खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील व कोरोना पॉझिटिव्ह असणाºया तीन कैद्यांनी सबजेलमधून धूम ठोकली होती. दोघांना जेल परिसरात पकडले तर तिसºयास टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथे पोलिसांनी अटक केली होती. 

कारागृहात ड्यूटीवरील पोलीस कर्मचाºयांची चौकशीसाठी तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे व चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची नेमणूक केली होती. त्यांच्या अहवालानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्या दोन पोलीस कर्मचाºयांना निलंबित केले आहे. 

१५ दिवसांत चार पोलीस निलंबित
मंगळवेढा सबजेल मधील कोरोना पॉझिटिव्ह कैदीस बेकायदेशीरपणे त्याच्या घरी नेऊन पार्टी करणाºया  पोलीस कर्मचारी बजरंग माने, उदय ढोणे या दोघांना  यापूर्वीच निलंबित केले आहे. त्यानंतर तीन कोरोना पॉझिटिव्ह व गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कैदी पलायन प्रकरणी नागनाथ डबरे, नामदेव कोळी या दोघांना निलंबित केले. त्या दिवशी सबजेलला ड्यूटीवरील अन्य अजित सुरवसे, अजित मिसाळ, अनिल दाते तिघांना  पोलिस मुख्यालयात बदलीची कारवाई झाली आहे. निष्काळजीपणामुळे १५ दिवसात चौघांना निलंबित व्हावे लागले.

कैदी पलायनप्रकरणी दोघांना निलंबित, तिघांना पोलीस मुख्यालयात बदलीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. कर्तव्यात कसूर करणाºया कोणचीही गय केली जाणार नाही.     
- अतुल झेंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सोलापूर

Web Title: Two policemen from Solapur rural police force suspended, three transferred to headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.