सोलापूरातील हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

By Appasaheb.patil | Updated: May 22, 2023 16:09 IST2023-05-22T16:09:44+5:302023-05-22T16:09:49+5:30

या घटनेने हिप्परगा गावावर शोककळा पसरली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लहान मुलं पाण्यात पोहण्यासाठी जात आहेत.

Two people drowned in Hipparga lake in Solapur | सोलापूरातील हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

सोलापूरातील हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

सोलापूर - हिप्परगा (ता. उ. सोलापूर) येथील तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सोमवारी दुपारी समोर आली. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

राजू कोळी व गणेश कोळी हे दोन मुलं हिप्परगा तलावात रविवारी २१ जून रोजी पोहायला गेली होती. त्यानंतर दुपारी चार वाजता ते पाण्यात बुडाले. त्यानंतर दोघांना शोधण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासन व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले मात्र त्याला यश आले नाही. त्यांचे मृतदेह पाण्यात सापडले. या घटनेने हिप्परगा गावावर शोककळा पसरली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लहान मुलं पाण्यात पोहण्यासाठी जात आहेत. पोहण्यासाठी गेल्यानंतर अचानक पाय घसरून खोलात गेल्याने बुडून मृत्यू झाला.

Web Title: Two people drowned in Hipparga lake in Solapur