सोलापूरात अवैध गॅस भरणा केंद्रावर दोन ठिकाणी धाडी,  १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 04:04 PM2017-08-29T16:04:43+5:302017-08-29T16:11:45+5:30

सोलापूर दि २९ : सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या मुळेगांव व कोंडी येथील अवैध गॅस भरणा केंद्रावर अचानक धाड टाकून १ लाख ३५ हजार ८२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीसांनी केली़ 

Two miscreants seized at an illegal gas payment center at Solapur, worth over Rs 1.45 lakh | सोलापूरात अवैध गॅस भरणा केंद्रावर दोन ठिकाणी धाडी,  १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोलापूरात अवैध गॅस भरणा केंद्रावर दोन ठिकाणी धाडी,  १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देमुळेगाव, कोंडी हद्दीत झाली कारवाईसोलापूर तालुका पोलीसांची कारवाईअवैध धंद्याविरोधात पोलीसांची धडक मोहिम सुरूच


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २९ : सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या मुळेगांव व कोंडी येथील अवैध गॅस भरणा केंद्रावर अचानक धाड टाकून १ लाख ३५ हजार ८२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीसांनी केली़ 
दरम्यान, कोंडी व मुळेगाव परिसरात गुप्त पध्दतीने अवैध गॅस वाहनात भरला जातो अशी माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, नायब तहसिलदार राजेश शेटे व विजय कवडे याच्या पथकाने कोंडी व मुळेगाव येथील अवैध गॅस भरणा केंद्रावर धाड टाकली़ या धाडीत भारत गॅस कंपनीचे चार सीलबंद टाक्या, दोन रिकाम्या टाक्या, इंण्डेन गॅस कंपनीची एक टाकी, आयकॉन कंपनीचा इलेक्ट्रीक काटा असा एकूण १५ हजार रूपये किंमतीचा राहुटी कोंडी या ठिकाणचा मुद्देमाल जप्त केला़ 
तर दुसºया कारवाईत मुळेगांव (ता़ द़ सोलापूर) येथील इंण्डेन कंपनीची गॅस टाकी, इलेक्ट्रीक काटा, सेल्को कंपनीचा इलेक्ट्रीक काटा, तीन चाकी अ‍ॅटो रिक्षा असा एकूण १ लाख २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला़ 
याप्रकरणी नागेश बाबु साखरे (वय २४), निखिल मोहन सावंत (वय २७ रा़ धवल नगर, दामले वस्ती, मुळेगांव), जावेद नजीर बागवान (वय ३५) या तिघांना अटक करून त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोसई खतीब, टिंगरे, पोना माळी, पोकॉ गायकवाड, शेख, शेळके यांनी केली़ 

Web Title: Two miscreants seized at an illegal gas payment center at Solapur, worth over Rs 1.45 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.