दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:17 IST2021-05-03T04:17:10+5:302021-05-03T04:17:10+5:30

पोलीस नाईक महेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय इरकर हे तिघे जण ३० एप्रिल रोजी घेरडी ...

Two lakh items confiscated | दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस नाईक महेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय इरकर हे तिघे जण ३० एप्रिल रोजी घेरडी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. बातमीदारामार्फत त्यांना सोनंद येथील कोरडा नदीपात्रात एक पांढऱ्या रंगाचे वाहन चोरून वाळू भरण्याच्या उद्देशाने गेल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तेथे जाऊन पाहिले असता तिघे जण खोऱ्या, पाटी घेऊन नदीपात्रातील वाळू भरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. मात्र, पोलिसांना पाहताच तिघेही अंधाराचा फायदा घेत पळून गेले. यावेळी पोलिसांनी २ लाखांचे एमएच- १० बीआर- ७६८६ चारचाकी वाहन, ६०० रुपये किमतीचे ३ खोरे, ३ पाट्या असा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस नाईक महेश पवार यांनी अज्ञात तिघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title: Two lakh items confiscated