आलेगावात दोन जर्सी गायींची चोरी

By Admin | Updated: May 11, 2014 00:26 IST2014-05-11T00:26:58+5:302014-05-11T00:26:58+5:30

सांगोला : अज्ञात चोरट्यांनी ग्रामपंचायत सदस्याच्या घरासमोरुन १ लाख रुपये किमतीच्या दोन दुभत्या जर्सी गायी चोरुन नेल्या.

Two jersey cows steal in Gelaga | आलेगावात दोन जर्सी गायींची चोरी

आलेगावात दोन जर्सी गायींची चोरी

 

सांगोला : अज्ञात चोरट्यांनी ग्रामपंचायत सदस्याच्या घरासमोरुन १ लाख रुपये किमतीच्या दोन दुभत्या जर्सी गायी चोरुन नेल्या. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आलेगाव (ता. सांगोला) येथे घडली. आलेगावचे ग्रा.पं. सदस्य श्रीमंत रामचंद्र लवटे यांच्या दोन जर्सी गायी चोरुन पोबारा केला. दरम्यान, पहाटे चारच्या सुमारास श्रीमंत लवटे घरासमोरील इलेक्ट्रीकल मोटार चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी परत येत असताना दोन जर्सी गायी गायब असल्याचे निदर्शनास आले. सकाळी आजूबाजूला जर्सी गायीची शोधाशोध करुनही मिळून आल्या नाहीत. याबाबत श्रीमंत लवटे यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. तपास हवालदार दीक्षित करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Two jersey cows steal in Gelaga