आॅनलाइन लोकमत सोलापूरकुरुल दि १ : ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाºया ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने दोघे ऊसतोड कामगार जागीच ठार झाले. शनिवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता मोहोळ तालुक्यातील कामती खु. शिवारात हा अपघात घडला. बालाजी दिगंबर गेजगे (वय ३०, रा. पिंपरी, ता. गंगाखेड, जि. परभणी ) व बाळू उर्फ वैजिनाथ दत्ता मुजमुले (वय ४०, रा.माळहिवरा, ता. परळी, जि. बीड) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. कामती खु.वरून ते हराळवाडीकडे जाणाºया उजनी कॅनॉलच्या रस्त्यावरुन ट्रॅक्टरमध्ये ऊस भरुन ऊसतोड कामगार परतीच्या वाटेवर निघाले होते. पाठीमागून येणाºया ट्रॅक्टरची जोरदार धडक बसल्याने पहिल्या ट्रॅक्टरमध्ये बसलेले दोघे ऊसतोड कामगार आत दबले गेले आणि उडून कॅनॉलमध्ये पडून जागीच मरण पावले. घटनेनंतर ट्रॅक्टरचालक अतुल यादव फरार झाला. या घटनेची फिर्याद हनुमान सुभाष थोरात (वय २५, धंदा - ऊसतोड कामगार, रा. गढाळा, ता.औंढा नागनाथ, जि. हिंगोली) यांनी दिली आहे. ट्रॅक्टरचालक अतुल यादव याच्या विरोधात भा. दं. वि. कलम २७९, ३०४ (२) मो.व्हे. अॅक्ट १८४, १३४ नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कालिदास ढवळे हे करीत आहेत.
कामतीनजीक दोन ऊसतोड मजूर ठार, दोन ट्रॅक्टरची झाली जोरदार धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 11:52 IST
ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाºया ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने दोघे ऊसतोड कामगार जागीच ठार झाले. शनिवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता मोहोळ तालुक्यातील कामती खु. शिवारात हा अपघात घडला.
कामतीनजीक दोन ऊसतोड मजूर ठार, दोन ट्रॅक्टरची झाली जोरदार धडक
ठळक मुद्देमोहोळ तालुक्यातील कामती खु. शिवारात हा अपघात घडलाकामती खु.वरून ते हराळवाडीकडे जाणाºया उजनी कॅनॉलच्या रस्त्यावरुन ट्रॅक्टरमध्ये ऊस भरुन ऊसतोड कामगार परतीच्या वाटेवर निघाले होतेपहिल्या ट्रॅक्टरमध्ये बसलेले दोघे ऊसतोड कामगार आत दबले गेले आणि उडून कॅनॉलमध्ये पडून जागीच मरण पावले