सोलापूरात दोन अवैध दारू भट्टीवर छापे , ८ लाखांचा माल नष्ट, दोघांविरूध्द गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 7, 2017 18:11 IST2017-06-07T18:11:30+5:302017-06-07T18:11:30+5:30

-

Two illicit liquor raid raided in Solapur and 8 lakhs of goods destroyed, both of them filed a complaint against them | सोलापूरात दोन अवैध दारू भट्टीवर छापे , ८ लाखांचा माल नष्ट, दोघांविरूध्द गुन्हा दाखल

सोलापूरात दोन अवैध दारू भट्टीवर छापे , ८ लाखांचा माल नष्ट, दोघांविरूध्द गुन्हा दाखल


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ७ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव तांडा येथील अवैध दारू भट्टीवर सोलापूर तालुका पोलीसांनी कारवाई केली़ या कारवाईत ८ लाख २७ हजार ४०० रूपयांचे रसायन नष्ट केले़ याप्रकरणी दोघांविरूध्द तालुका पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत़
पोलीस महासंचालक यांनी रमजान ईदच्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार सोलापूर तालुका पोलीसांनी मुळेगांव तांडा येथे चोरून चालणाऱ्या दोन अवैध दारू भट्टीवर छापे मारले़ यात १९७ बॅरेलमधील ३९ हजार ४०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन नष्ट केले़ याप्रकरणी किसन नामदेव राठोड व भारत बाळू राठोड या दोघांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहे़
ही कारवाई पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, सपोनि कोळी, पोहेकॉ गायकवाड, चवरे, फुलारी, गवळी, पवार, चव्हाण, पोना माळी, व्होनमाने, कोरे, पवार, मपोना कोकणे, पोकॉ फडतरे, नेमाजी शेख, मोटे, भिंताडे, चासपोफौ पवार तसेच पोलीस मुख्यालयाकडील स्टायकिंग फोर्स व पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली़

Web Title: Two illicit liquor raid raided in Solapur and 8 lakhs of goods destroyed, both of them filed a complaint against them