शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 09:38 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच -०९ एफबी-३९ ०८ या कार मधून तुळजापूर येथील नवरात्रीनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते

- अरुण लिगाडे 

सांगोला : तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांची भरधाव वेगाने जाणारी कारने पाठीमागून मालट्रकला जोराची धडकून भीषण अपघातात  दोघेजण जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास सोलापूर - सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास (ता. सांगोला) येथे घडला. अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

सुखदेव बामणे (४०) व नैनेश कोरे (३१ दोघेही रा. नांदणी जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत तर अनिल शिवानंद कोरे  (४२, रा.नांदणी), सुधीर चौगुले (३५ रा.वडगाव), सुरज विभुते (-२१ रा.कोठली) हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व सांगोला पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तकार रोडवरुन बाजूला काढून जखमींना उपचार करता तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच -०९ एफबी-३९ ०८ या कार मधून तुळजापूर येथील नवरात्रीनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते, दर्शनानंतर त्याच कारमधून पाचजण सोलापूरकडून हायवेने नांदणी जि. कोल्हापूर गावाकडे निघाले होते. वाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपास वर त्यांच्या भरधाव कारची पाठीमागून डाळिंब घेऊन जाणाऱ्या १६ चाकी एम पी -२० झेड एम -९५१८ या माल ट्रकला जोराची धडक बसून हा भीषण अपघात घडला.

अपघात इतका भीषण होता की, कार मधील दोघेजण उडून बाहेर फेकल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता तर चालक कार मध्ये अडकून पडल्याने पोलिसांनी त्याला बाहेर काढून मदत केली.

टॅग्स :Accidentअपघात