आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा दोघा मुलांनीच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:21 IST2021-04-15T04:21:07+5:302021-04-15T04:21:07+5:30

७ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास आई अविदा हीस वडील मयत भैरू हे मारहाण करीत होते. यावेळी संशयित ...

The two children killed the father who was harassing the mother | आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा दोघा मुलांनीच केला खून

आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा दोघा मुलांनीच केला खून

७ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास आई अविदा हीस वडील मयत भैरू हे मारहाण करीत होते. यावेळी संशयित निखिल जगताप व अक्षय जगताप, दोघे रा. वरकुटे (ता. करमाळा) यांनी संगनमत करून भैरू भागवत जगताप (वय ५५, रा. वरकुटे-मूर्तीचे) यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा निखिल व अक्षय या दोघांनी वडिलांना जबरदस्तीने पकडून त्यांचे दोरीने पाय बांधले. त्यानंतर त्यांच्या गळ्याभोवती दोरीचा फास गुंडाळून तो आवळला. त्यांना फरपटत घरा बाजूला असलेल्या झाडाजवळ नेऊन जिवे ठार मारले.

भैरू जगताप यांच्या मृत्यूची कोणतीही खबर न देता लोकांना मरणाची खोटी माहिती देऊन मृतदेहाचा परस्पर अंत्यविधी करून पुरावा नष्ट केला. त्यानंतर पोलीस निरिक्षक श्रीकांत पाडुळे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, श्रीकांत हराळे यांनी कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्या दोघांविरोधात आपल्याच वडिलांचा खून केल्याचे स्पष्ट झाल्याने गुन्हा नोंदला आहे.

Web Title: The two children killed the father who was harassing the mother