नरखेडजवळ तुळजापूरला निघालेल्या भाविकांना लुटणारे दोघे अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:24 IST2021-09-18T04:24:16+5:302021-09-18T04:24:16+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील वसई येथील कुवर महंमद नादिर व त्यांचे मित्र नितीन पांचाळ व ड्रायव्हर ...

नरखेडजवळ तुळजापूरला निघालेल्या भाविकांना लुटणारे दोघे अटक
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील वसई येथील कुवर महंमद नादिर व त्यांचे मित्र नितीन पांचाळ व ड्रायव्हर उमाशंकर बसवराज यादव हे तिघे जण (कार क्र- एम एच २, इआर ५३४४) या गाडीतून तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास मोहोळ- वैराग रोडवर नरखेड परिसरात भोयरे पाटीजवळ गाडी लघुशंकेसाठी थांबवली. तेव्हा अचानक चेहऱ्याला मास्क बांधलेल्या सहा ते सात इसमांनी गाडीला घेराव घालत कोयता, चाकू व काठीचा धाक दाखवून १ लाख १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला होता. या प्रकरणी डीबी पथकातील पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रवीण साठे, सिदार्थ मोरे, सचिन माने, शिवाजी मुंढे, धर्मे यांच्या पथकांनी नरखेड येथून हारकू रामराया काळे नरखेड व अनिल अनसर शिंदे वैराग या दोघांना ताब्यात घेतली. त्या दोघांना मोहोळ येथील न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आशुतोष चव्हाण हे करीत आहेत.