चार हजारांच्या वाळूसह अडीच लाखांचे चारचाकी वाहन ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST2021-05-11T04:23:18+5:302021-05-11T04:23:18+5:30

पोलीस नाईक महेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख व होमगार्ड ननवरे असे तिघेजण खासगी वाहनाने सांगोला शहर हद्दीतील अवैद्य ...

Two and a half lakh four-wheelers with four thousand sands in their possession | चार हजारांच्या वाळूसह अडीच लाखांचे चारचाकी वाहन ताब्यात

चार हजारांच्या वाळूसह अडीच लाखांचे चारचाकी वाहन ताब्यात

पोलीस नाईक महेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख व होमगार्ड ननवरे असे तिघेजण खासगी वाहनाने सांगोला शहर हद्दीतील अवैद्य धंद्यावर कारवाई करण्यासाठी सांगोला ते एखतपूर रोड बायपासने जात होते. त्यांना चारचाकी वाहनातून अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. एखतपूर पुलाजवळ समोरून येणारे वाहन अडवले. संशय आल्याने वाहनातील चालक व त्याच्या बाजूस बसलेली व्यक्ती असे दोघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पोलिसांनी एमएच-०९ सीयू ०४६३ या क्रमांकाचे २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या वाहनासह ४ हजार रुपयांची अर्धा ब्रास वाळू असा सुमारे २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस नाईक महेश पवार यांनी अज्ञात दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title: Two and a half lakh four-wheelers with four thousand sands in their possession