वर्गणीची सक्ती करणारे दोन कार्यकर्ते अटकेत
By Admin | Updated: May 12, 2014 00:50 IST2014-05-12T00:50:45+5:302014-05-12T00:50:45+5:30
सोलापूर : दमदाटी आणि शिवीगाळ करीत जबरदस्तीने ११ हजार रुपयांची वर्गणी मागणार्या दोन कार्यकर्त्यांना जोडभावीपेठ पोलिसांनी अटक केली.

वर्गणीची सक्ती करणारे दोन कार्यकर्ते अटकेत
सोलापूर : दमदाटी आणि शिवीगाळ करीत जबरदस्तीने ११ हजार रुपयांची वर्गणी मागणार्या दोन कार्यकर्त्यांना जोडभावीपेठ पोलिसांनी अटक केली. तिमय्या रामलू कुडाबाई (वय-२७) आणि अमोल अशोक गोसावी (वय-३०, रा. एन. जी. मिल चाळ, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी शिवप्रतिज्ञा प्रतिष्ठान स्थापन करून शंभूराजे यांच्या जयंती उत्सवासाठी दीपककुमार घनश्याम जोशी (वय-२८, रा. नाथ रेसिडेन्सी, रुपाभवानी चौक, सोलापूर) यांच्याकडे जाऊन ११ हजार रुपयांची वर्गणी मागितली. त्यास नकार दिल्याने दोघांनी चिडून त्यांना शिवीगाळ करीत दमदाट केली. जोशी यांनी जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, तपास हवालदार मोटे करीत आहेत. (