जुळे सोलापुरात चालणाºया वेश्या व्यवसायावर धाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 08:58 PM2019-08-26T20:58:30+5:302019-08-26T21:02:54+5:30

जगदंबा नगरात केली कारवाई; चालकासह तिघांवर गुन्हा दाखल; महिलांची सुधारगृहात रवानगी

The twins raided a prostitution business in Solapur | जुळे सोलापुरात चालणाºया वेश्या व्यवसायावर धाड 

जुळे सोलापुरात चालणाºया वेश्या व्यवसायावर धाड 

googlenewsNext
ठळक मुद्देजुळे सोलापुरातील जगदंबा नगरातील भाड्याच्या घरात चालणाºया वेश्या व्यवसायावर सोलापूर शहर पोलिसांनी धाड टाकली. पोलीसांनी चालकासह तिघांना अटक करून व्यवसायातील महिलांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली तिघांना सोमवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे.एम. मिस्त्री यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

सोलापूर : जुळे सोलापुरातील जगदंबा नगरातील भाड्याच्या घरात चालणाºया वेश्या व्यवसायावर सोलापूर शहर पोलिसांनी धाड टाकली. ही कारवाई सोमवारी दुपारी ३ वाजता करण्यात आली. यावेळी पोलीसांनी चालकासह तिघांना अटक करून व्यवसायातील महिलांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. 

सागर महादेव पवार (वय २७ रा. जय मल्हार चौक, बुधवार पेठ सोलापूर), अमर बसवराज थंब (वय ३१ रा. मल्लिकार्जून नगर, सुत मिलजवळ अक्कलकोट रोड, सोलापूर), सुनिल राजकुमार हत्ते (वय २७ रा. मल्लिकार्जून नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. काही महिन्यांपासुन जगदंबा नगरातील वास्तु विहारमधील बालाजी कठारकर यांच्या रो हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. फौजदार माधव बेंबडे (वय ३१) यांनी पथकासह धाड टाकण्याचा निर्णय घेतला. 

प्रथमत: बनावट ग्राहक पाठवून दिले. ग्राहकाने आतमध्ये जाऊन चौकशी केली, त्यामध्ये दिड हजार रूपये देण्याचे ठरले. ५00 रूपये देवुन राहिलेले पैसे डिक्कीतुन आणतो असे सांगुन बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याने दबा धरून बसलेल्या पोलिसांना इशारा केला. तत्काळ पोलिसांनी घरात जाऊन पाहणी केली असता तेथे दोन महिला आढळुन आल्या. दोन्ही महिलांनी त्या ओडीसा व पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्याचे सांगत सागर पवार याने येथे वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणल्याची कबुली दिली.
--------------
आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी
जुळे सोलापुरातील वेश्या व्यवसायावर धाड टाकुन अटक करण्यात आलेल्या सागर पवार, अमर थंब व सुनिल हत्ते या तिघांना सोमवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे.एम. मिस्त्री यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 

Web Title: The twins raided a prostitution business in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.