शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्ष बहिणीनं सांभाळलं...अखेर शेजाºयांनी केले अंत्यसंस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 10:06 IST

लॉकडाऊन अन् गरिबीचा फटका; गोदुताई विडी घरकुल येथील श्रमिकांनी दाखवली एकी

ठळक मुद्देलोकवर्गणीतून दत्तात्रय गुर्रम त्यांच्यावर अंत्यविधीधार्मिक विधीनुसार सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाºयांकडून अंत्यसंस्कारघरकुल परिसरातील लोकांनीही केली मोठी मदत

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : वेळ आणि काळ हे काही सांगून येत नाहीत. एकीकडे जबरदस्त लॉक डाऊन सुरू असताना दुसरीकडे घरची गरिबी देखील त्याच तीव्रतेने परीक्षा पाहिल्यास एका बहिणीची काय अवस्था होईल, हे न सांगितलेलं बरं. 

गेल्या वीस वषार्पासून आपल्या भावाला सांभाळणाºया  बहिणीची ही व्यथा आहे. दोन वषार्पासून आजारी असलेला भाऊ एकाकी देवाघरी गेला. भावाच्या अंत्यविधीचा बाका प्रसंग तिच्यासमोर उद्भवला. भावाच्या अंत्यविधीसाठी तिने आसपास नागरिकांकडे पदर पसरला. तिची अवस्था पाहून शेजारीपाजारी मदतीला धावून आले. अवघ्या काही मिनिटात तब्बल अकरा हजार रुपये अंत्यविधीसाठी जमा झाले. मग शेजा?्यांकडूनच् अंत्यविधीची तयारी सुरू झाली. गोदुताई विडी घरकुल येथील श्रमिकांच्या माणुसकीने एका गरीब बहिणी समोरील संकट दूर झाले.

गोदुताई विडी घरकुल येथील रहिवासी दत्तात्रेय गुर्रम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५२ वर्षाचे होते. बहिण अंबाबाई सुरेश येदूर ( वय ५०, रा- गोदुताई विडी घरकुल) यांच्याकडे ते राहायचे. गेल्या काही वर्षापासून ते आजारी होते. ते विवाहित असून बायको आणि दोन मुली हे विभक्त राहतात. दत्तात्रेय हे बहीण अंबाबाई यांच्याकडेच राहायचे. अंबाबाई यांची परिस्थिती देखील गरिबीची आहे. त्यांचा मुलगा अमर हा लॉक डाऊनमुळे हैदराबाद मध्ये अडकून आहे. दत्तात्रेय यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबियांना दिल्यानंतर ते काही तासांनी आले. तोपर्यंत बहीण अंबाबाई या गोदुताई येथील नागरिकांच्या मदतीने अंत्यविधीची तयारी सुरू केली.

अंबाबाई या भाड्याच्या घरात राहत असल्याने त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. अंत्यविधीची अंत्यविधीच्या खर्चाकरिता त्यांनी आसपास नागरिकांकडे मदत मागितली त्यानंतर घरकुल येथील नागरिकांनी कोणी दहा, कुणी वीस रुपये तर कुणी पन्नास-शंभर रुपये अशी मदत देऊ केली. ----------------लॉक डाऊन असल्याने  नातेवाईक कोणीसुद्धा अंत्यविधीच्या तयारीला पुढे कोणी येईनात. माहिती जवा घरकुल येथील काही सार्वजनिक मंडळांना कळली त्यांनी स्व-पुढाकाराने अंत्यविधीच्या तयारीला हातभार लावला. मोजून सात ते आठ लोकांनी अंत्यविधीची तयारी करून येथील हिंदू स्मशानभूमी मध्ये धार्मिक विधीनुसार दत्तात्रेय यांच्यावर अंत्यसंस्कार केले. श्री सिध्दिविनायक मित्र मंडळ, मातृभुमी मित्र मंडळ, श्री कृष्ण मित्र मंडळ, श्री विनायक विघ्नहरता मित्र मंडळ तसेच माकपाचे कार्यकर्ते हसन शेख व मधुकर चिल्लाळ यांच्या सहकार्याने दत्तात्रेय त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू