शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

३० वॉटर व्हेंडिंग मशीनव्दारे १२ हजार रेल्वे प्रवासी पितात रोज पाऊण लाखाचं पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:30 IST

शुद्ध पाण्याची गोडी : विभागात रेल्वे स्थानकांवर बसवले ३० वॉटर व्हेंडिंग मशीन

ठळक मुद्देसोलापूर स्थानकावर एकूण ८ मशिन्स बसविण्यात आल्याप्रवाशांना स्वस्तात आणि तत्काळ पाणी उपलब्ध१२ हजार प्रवाशांना किमान ६० हजार रुपयांचे पाणी

काशिनाथ वाघमारेसोलापूर : खानपान आणि रेल्वे प्रवास या दोन गोष्टी जीवनात पक्क्या ठरलेल्या आहेत़ एकेकाळी रेल्वे स्थानकावर नळाने होणाºया पाणी पुरवठ्याची जागा आता वॉटर व्हेंडिंग मशीनने घेतली आहे़ केवळ ‘पाच रुपये क्वाईन टाका, बाटलीभर शुद्ध पाणी मिळवा’ हा संदेश आता प्रत्येक प्रवाशापर्यंत पोहोचला आहे़ परिणामत: विभागात दररोज १२ हजार प्रवाशांना किमान ६० हजार रुपयांचे पाणी पाजले जात आहे़ याबरोबरच सार्वजनिक नळावर अवलंबून असणाºया प्रवाशांनाही आता शुद्ध पाण्याची गोडी लागली आहे

सोलापूर विभागात सोलापूरसह नगर, सांगली, दौंड, उस्मानाबाद, लातूर, गुलबर्गा आदींचा समावेश आहे़ या विभागातून दररोज शंभराहून अधिक गाड्या धावतात़ मोठ्या स्थानकांवर काही लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात़ यातील गरीब आणि मध्यम वर्गाचा पाच रुपयांत उपलब्ध होणाºया पाण्याकडे कल आहे़ उच्च वर्गातील प्रवासी हा बाटलीबंद पाण्यावर अवलंबून आहे़ 

सोलापूर स्थानकावर प्लॅटफॉर्म एकवर दोन मशिन्स, दोन-तीन नंबर प्लॅटफॉर्मवर तीन मशिन्स, चार-पाच क्रमांकाच्या प्लॅटफ ॉर्मवर दोन मशिन्स बसविण्यात आले आहे़ मागील काही दिवसांत जनरल तिकीट केंद्राजवळ एक मशीन नव्याने बसवली गेली आहे़ 

मध्यम, गरीब वर्गाचा कल- सोलापूरसह विविध रेल्वे स्थानकांवर गेल्या वर्षभरात वॉटर व्हेंडिंग मशिन्स बसविण्यात आले आहे़ पहिल्या टप्प्यात दौंड, कुर्डूवाडी स्थानकावर त्यानंतर सोलापूर स्थानकावर या मशिन्स बसविण्यात आल्या आहेत़ वर्षभरात बहुतांश स्थानकांवर मशिन्स बसविण्यात आल्या आहेत़ तत्पूर्वी मध्यम आणि गरीब वर्ग हा स्थानकावरील नळावर पाणी पित होता़ आता स्थानकावरील स्टॉलवर पाण्याची बाटली १२ ते १५ रुपयांत उपलब्ध होते़ हीच सेवा आणखी स्वस्तात देण्याच्या हेतूने मागील वर्षी स्थानकावर सरळ मशीन बसविण्याचा निर्णय घेतला गेला़

- सोलापूर स्थानकावर एकूण ८ मशिन्स बसविण्यात आल्या आहे़त़ प्रवाशांना स्वस्तात आणि तत्काळ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ही या वॉटर व्हेंडिंग मशिन्स बसविण्यात आले आहेत़़ विभागात जवळपास ३० मशिन्स गेल्या वर्षभरात बसवल्या गेल्या आहेत़ मशीनमधील वॉटर प्युरीफायरची सातत्याने देखभाल घेतली जाते़ प्रवाशांनाही शुद्ध पाण्याची सवय जडत आहे़ परिणाम चांगला दिसून येतोय़ - आऱ के़ शर्मा, विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेWaterपाणीwater transportजलवाहतूक