कॅरीबॅगमध्ये ठेवलेली बारा हजारांची रोकड पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:24 IST2021-09-21T04:24:58+5:302021-09-21T04:24:58+5:30

अक्कलकोट : आठवडा बाजारासाठी अक्कलकोट येथे आलेल्या महिलेला गंडवण्याचा प्रकार सोमवारी दुपारी एक वाजता घडला. या महिलेने कॅरीबॅगमध्ये १२ ...

Twelve thousand cash kept in a carrybag was stolen | कॅरीबॅगमध्ये ठेवलेली बारा हजारांची रोकड पळवली

कॅरीबॅगमध्ये ठेवलेली बारा हजारांची रोकड पळवली

अक्कलकोट : आठवडा बाजारासाठी अक्कलकोट येथे आलेल्या महिलेला गंडवण्याचा प्रकार सोमवारी दुपारी एक वाजता घडला. या महिलेने कॅरीबॅगमध्ये १२ हजार रुपयांची रोकड ठेवली होती. नजर चुकवून चोरट्यांनी रक्कम पळवली.

फत्तेसिंह चौक ते तूप चौक दरम्यान ती चालत येत असताना अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून ही चोरी केली. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

पोलीस सूत्रांनुसार फिर्यादी कमलाबाई महातया स्वामी (वय ३५, रा. बासलेगाव) ही महिला सोमवार बाजाराचा दिवस असल्याने खरेदीसाठी १२ हजार रुपये रोख रक्कम घेऊन अक्कलकोट येथे आली होती. सोबत आणलेले पैसे कॅरीबॅगमध्ये ठेवले होते. गर्दीचा फायदा घेऊन चोरटा हे पैसे घेऊन पळाला. अधिक तपास पोलीस हवालदार राजू फुलारी करीत आहेत.

Web Title: Twelve thousand cash kept in a carrybag was stolen