शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

शिकाºयांनी नेम साधून पकडले बारा पारवे  ग्रामस्थांनी उधळून लावला बेत सारा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:48 IST

विलास जळकोटकर  सोलापूर : एकीकडे वन्यजीवांच्या रक्षणासाठी शासनस्तरापासून ते अनेक स्वयंसेवी संस्थांंकडून प्रयत्न होताहेत. असे असतानाही अंधश्रद्धेपोटी काही पक्ष्यांची ...

ठळक मुद्देअंधश्रद्धेपोटी तळेहिप्परगा येथे दोन शिकाºयांनी १२ पारवे पकडलेवन्यजीव विभागाला ही बाब येताच पारव्यांसह दोघा शिकाºयांना वन विभागाच्या ताब्यात

विलास जळकोटकर 

सोलापूर : एकीकडे वन्यजीवांच्या रक्षणासाठी शासनस्तरापासून ते अनेक स्वयंसेवी संस्थांंकडून प्रयत्न होताहेत. असे असतानाही अंधश्रद्धेपोटी काही पक्ष्यांची शिकार होण्याच्या घटना घडतात. तळेहिप्परगा येथे दोन शिकाºयांनी १२ पारवे पकडले अन् ते घेऊन जात असताना याच परिसरातील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांचा दयानंद कॉलेजरोडपर्यंत पाठलाग करून पकडले अन् पोलिसांच्या स्वाधीन केले. वन्यजीव विभागाला ही बाब येताच पारव्यांसह दोघा शिकाºयांना वन विभागाच्या ताब्यात दिले. मंगळवारी सकाळी ८.३० च्या दरम्यान ही घटना घडली. 

दरम्यान, वनविभागाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत दोन शिकाºयांविरुद्ध १०७२ वन्यजीव अधिनियम अंतर्गत कलम ९ व ३९ अन्वये गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले आहे. उद्या (बुधवारी) त्यांना न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. लक्ष्मण काळे व संतोष चव्हाण (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सलगर वस्ती, सोलापूर)अशी दोन शिकाºयांची नावे असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव यांनी सांगितले. 

जाधव यांनी स्पष्ट केले की, मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तळेहिप्परगा गावाजवळ लक्ष्मण काळे आणि संतोष चव्हाण या दोघा शिकाºयांनी मंगळवार बाजारामध्ये विक्रीला नेण्यासाठी बारा पारव्यांना पकडले. हा प्रकार येथील काही  ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यांनी दोघांना हटकताच ते पळून जाऊ लागले. ग्रामस्थांपैकी दोघांनी त्यांचा दयानंद कॉलेज रोडपर्यंत पाठलाग केला आणि पकडले. तेथून जवळच असलेल्या जोडभावी पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. 

पोलिसांनी संबंधित प्रकार वन विभागांतर्गत येत असल्याने त्यांनी वन विभागाला संपर्क साधला आमच्या विभागाचे वनपाल चेतन नलवडे, वनरक्षक शुभांगी कोरे, वाहनचालक कृष्णा नरवणे दुपारी पोलीस ठाण्यातच पोहोचले. पोलीस गायकवाड यांनी दोघा शिकाºयांना आणि त्यांनी पकडलेल्या १२ पारवे त्यांच्या ताब्यात दिले.

संबंधित प्रकाराबद्दल शहानिशा करुन दोन शिकारी, पारवे आणि त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. वन्यजीव प्राण्याची शिकार करणे अथवा बाळगणे हा कायद्याने गुन्हा असल्याने दोघांविरुद्ध १०७२ वन्यजीव अधिनियम अंतर्गत कलम ९ व ३९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तपास वनपरिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव करीत आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

अंधश्रद्धेतून पकडले पारवे- पारव्यांचे रक्त अर्धांगवायू (पॅरालिसीस) आजार झालेल्या रुग्णांना लावल्यास त्यांचा आजार बरा होतो, असा समज असल्याने अनेक जण जादा किंमत मोजून हे पारवे घेत असल्याचे लक्षात आल्याने या दोन शिकाºयांनी हिप्परगा येथे पारव्यांना पकडल्याची माहिती त्यांची चौकशी करताना वन विभागाच्या पथकासमोर आली. शिवाय पकडण्यात आलेले पारवे उडून जाऊ नयेत म्हणून त्यांचे पंख मोडण्यात आल्याचे पंचनामा करताना वन खात्याच्या पथकाच्या निदर्शनास आले. 

काय आहे शिक्षेची तरतूद- वन्य जीव पक्ष्यांना ताब्यात ठेवणे, त्यांची शिकार करणे हा १९७२ वन्य जीव अधिनियम अंतर्गत गुन्हा ठरतो. त्यानुसार दोन्ही आरोपींवर कलम ९ व ३९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या कलमांतर्गत २५ हजार रुपयांचा दंड आणि किमान १ ते ७ वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो, असे वनविभागामार्फत सांगण्यात आले.

वन्य जीव पशु-पक्ष्यांची शिकार करणे हे कायद्यानुसार गुन्हा ठरतो. पक्षी-प्राण्यांच्या रक्षणासाठी अशा कृत्यावर अंकुश ठेवण्यासाठी वन विभाग कार्यरत आहे. पर्यावरण रक्षणासाठी आणि पक्षी-प्राण्यांच्या घटणाºया प्रजाती वाचविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. शिकारीचे प्रकार आपल्या आजूबाजूला घडत असल्यास सतर्क राहून वन विभागास कळवावे. संबंधितांची नावे गुप्त ठेवण्यात येतील. पर्यावरणपूरक चळवळीत प्रत्येकाने सहयोग द्यावा.-निकेतन जाधव, वन परिक्षेत्र अधिकारी, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरbirds sanctuaryपक्षी अभयारण्यPoliceपोलिस