शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न : आसगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:20 IST2020-12-24T04:20:23+5:302020-12-24T04:20:23+5:30
पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर प्रथमच सांगोला भेटीच्या निमित्ताने सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर काॅलेजवर आले होते. ...

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न : आसगावकर
पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर प्रथमच सांगोला भेटीच्या निमित्ताने सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर काॅलेजवर आले होते. यावेळी प्रा. पी. सी. झपके यांच्यासह विविध संस्था चालक, शिक्षक संघटनांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी रामकृष्ण एज्युकेशन संस्थेचे बाबुराव गायकवाड, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे-पाटील, माजी झेडपी अध्यक्षा जयमाला गायकवाड, सांगोला तालुका संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष रमेश शेंडगे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक सुनील भोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत रायचुरे यांनी केले. तर भीमाशंकर पैलवान यांनी आभार मानले.
फोटो ओळ ::::::::::::::::::::::::::::::
पुणे शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. प्रा. जयंत आसगावकर यांचा प्रा. पी. सी. झपके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाबुराव गायकवाड, जयमाला गायकवाड आदी.