शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कंदलगाव येथे बँक फोडण्याचा प्रयत्न, जाता जाता चोरट्यांनी केली संगणकाची मोडतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 12:30 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील बँक आॅफ इंडियाची शाखा फोडून चोरट्याने आतील संगणकाची मोडतोड केली.

ठळक मुद्दे- मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- चोरट्यांना एटीएम व स्ट्रॉगरूम फोडता आले नाही- ठसेतज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील बँक आॅफ इंडियाची शाखा फोडून चोरट्याने आतील संगणकाची मोडतोड केली. शनिवारी पहाटे पावणेतीन वाजता हा प्रकार घडला. एटीएम व स्ट्राँगरुम फोडता न आल्याने चोरट्यांनी जाताना एका घरात व  पानटपरीत चोरीचा प्रयत्न केला. 

कंदलगावात तेलगाव रस्त्यावर कोले यांच्या जागेत बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत पहाटे साडेतीन वाजेच्या सुमाराला चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी सुरुवातीला बँकेसमोर असलेल्या एटीएमच्या शटरचे कुलूप तोडून बाजूला फेकले. सेंट्रल लॉकमध्ये शटर उघडले नाही. त्यामुळे चोरट्यांनी शाखेकडे मोर्चा वळविला.

शाखेचे शटर उचकटून आत प्रवेश केला. स्ट्राँगरुम उघडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. पण त्यात यश न आल्याने शाखा व्यवस्थापकाच्या केबीनमध्ये प्रवेश करून तेथील संगणकाचा सीपीओ खाली टाकला. की बोर्डची मोडतोड केली. जाताना चोरट्यांनी बँकेसमोरील एक पानटपरी फोडली. या ठिकाणीही काही हाती न लागल्याने आतील सामानाची उलथापालथ केली. याच रस्त्यावरील एक बंद घर फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला.

सकाळी सात वाजता गावात चोरी झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. बँकेचे शिपाई शिवराम कोळी यांनी दिलेल्या माहितीवरून शाखा व्यवस्थापक शांतप्पा सलगरे यांनी आठ वाजता घटनास्थळी धाव घेतली व मंद्रुप पोलिसांना माहिती दिली. सपोनि धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. अधीक्षक कार्यालयातील ठसेतज्ज्ञ व श्वानपथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. शाखा व्यवस्थापक सलगरे यांची फिर्याद घेऊन मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सपोनि धांडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरtheftचोरीbankबँकBank of Indiaबँक ऑफ इंडियाSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस