ट्रक-दुचाकीची धडक; एक ठार
By Admin | Updated: June 11, 2014 00:42 IST2014-06-11T00:42:21+5:302014-06-11T00:42:21+5:30
पंढरपूर : येथील कर्मवीर भाऊराव कॉलेज चौकात मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या ट्रक व दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला.

ट्रक-दुचाकीची धडक; एक ठार
पंढरपूर : येथील कर्मवीर भाऊराव कॉलेज चौकात मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या ट्रक व दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला.
कोठारी अॅग्रोच्यासमोर एम. एच. १२ सी. एन. ६२५१ या दुचाकीवरुन देविदास सदाशिव कांबळे (वय २७) व प्रशांत दुर्याेधन श्रीखंडे (वय २८ दोघेही रा. पटवर्धन कुरोली) येत होते. समोरुन एम. एच. २३ डब्ल्यू २२७७ हा ट्रक येत होता.
या दोघांमध्ये धडक झाली. यामध्ये देविदास कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रशांत श्रीखंडे हे जखमी झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपास फौजदार मारुती माने करीत आहेत.