स्मशानभूमीतील बांबू गोळा करुन झाडांचं रक्षण करायचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:26 IST2021-08-28T04:26:20+5:302021-08-28T04:26:20+5:30
अलीकडे सद्गुरु... बैठकीच्या निमित्ताने श्रमदान, स्मशानभूमी स्वच्छता व वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम राबविले जातात. युवराज पैकेकरी यांना या निमित्ताने ...

स्मशानभूमीतील बांबू गोळा करुन झाडांचं रक्षण करायचा
अलीकडे सद्गुरु... बैठकीच्या निमित्ताने श्रमदान, स्मशानभूमी स्वच्छता व वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम राबविले जातात. युवराज पैकेकरी यांना या निमित्ताने झाडे लावणे व जगविण्याचे व्यसनच जडले.
त्यांनी व सहकाऱ्यांनी अगोदर बीबीदारफळ येथील शिवाजी चौक ते कोंडी रोडलगत झाडे लावली व पाणी घालून जोपासनाही केली. आता ती झाडे मोठी झाली आहेत. लावलेल्या रोपांना आधार देण्यासाठी युवराज पैकेकरी यांनी सोलापूरमधील विविध स्मशानभूमीतील पडलेले बांबू स्वतःच्या गाडीवर वेळोवेळी आणले. ते रोपाशेजारी रोवले व पाणी घालून रोपांची देखभाल मोफत केली. पैकेकरी या वृक्षवेड्याचा मराठा सेवा संघाच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवाजी पाटील, अमोल पाटील, श्रीकांत ननवरे, तुकाराम साठे, हमु साठे, अजय पतंगे, नारायण साबळे, आण्णा कदम, शशिकांत थोरात, दिगंबर ननवरे, विजय साठे, हणमंत चव्हाण, शंकर साठे, दीपक कदम, ब्रह्मदेव ननवरे, नितीन गव्हाणे, दशरथ गायकवाड, आदी उपस्थित होते.
.........
झाडांना ठिबकने पाणी
मागील वर्षी आठवडा बाजार परिसर, तसेच स्मशानभूमीत त्यांनी विविध प्रकारची ३५० रोपांची लागवड करून त्याची जोपासनाही केली. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील व ग्रामसेवक संजय पाटील यांनी ग्रामपंचायत कर्मचारी शैलेश साठे व गणेश ननवरे यांना सोबत घेत झाडांना ठिबक करून दिले.
----
फोटो ओळ
मराठा सेवा संघाच्यावतीने युवराज पैकेकरी या वृक्षमित्राचा सन्मान करताना शिवाजी पाटील, अमोल पाटील, श्रीकांत ननवरे, तुकाराम साठे, हमू साठे, अजय पतंगे, नारायण साबळे, आदी उपस्थित होते.
(फोटो २७उत्तर सोलापूर पैकेकरी)