शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष-वेलीप्रेमींनी मोबाईल अ‍ॅपवरून केली ऑनलाइन परसबागेची सैर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:37 IST

‘परसबाग सोलापूर’चा उपक्रम; रोपे, बीजांच्या माहितीची देवाण-घेवाण

ठळक मुद्देमागील तीन महिन्यांपासून बागेला भेट देण्याचा उपक्रम घेण्यात आला सदस्यांनी देखील उत्साह दाखवत या आॅनलाईन उपक्रमात सहभाग घेतलायेत्या काळात आणखी चांगले उपक्रम घेणे व नव्या बागप्रेमींना सोबत घेण्याचा मानस

सोलापूर : कोरोना लॉकडाऊननंतरही शासकीय, खासगी कार्यालयात काहीअंशी ऑनलाइन काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेसही सुरू आहेत. याच पद्धतीने सोलापुरातील बागप्रेमी मोबाईल अ‍ॅपचा वापर करून व्हर्च्युअल बागभेटीचा उपक्रम आयोजित करीत आहेत. त्यामध्ये बाग, परसबागेतील प्रत्येक रोप अन् त्याच्या बिजांसंदर्भात माहितीचे आदान - प्रदान करीत आहेत.

परसबाग सोलापूरची शहरातील परसबाग प्रेमी, पर्यावरणावर प्रेम करणाºयांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून बागेसाठीची माहिती, रोप, बिया यांचे मोफत आदान-प्रदान केले जाते. सोलापूर शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जावे यासाठी हा ग्रुप सुरु करण्यात आला आहे. 

या ग्रुपच्या माध्यमातून आठवड्यातून एका सदस्याच्या घरी असलेल्या बागेला भेट दिली जाते. तिथे सगळे ग्रुपमधील सदस्य ठरलेल्या वेळी येतात. ज्यांनी बाग फुलविली ते बागेची माहिती देतात. यातून नव्या कल्पना आकाराला येतात. तसेच काही रोप वाढवताना येणाºया अडचणींवर कशी मात करायची हे देखील सांगितले जाते.

मागील तीन महिन्यांपासून बागप्रेमींनी कोणत्याही सदस्याच्या बागेला भेट दिली नव्हती. काही नियम लागू असल्याने अडचणी येत होत्या. यावर पर्याय म्हणून आॅनलाईन भेट देण्याचे ठरले. सर्व सदस्यांनी होकार देत या नव्या संकल्पनेला साथ देण्याचे ठरले. भवानी पेठ येथील जितेंद्र भडंगे यांच्या बागेला आॅनलाईन भेट देण्यात आली.

खराब झालेला माठ, पाण्याच्या टाकीने नवा लूकजितेंद्र भडंगे यांच्या बागेमध्ये अनेक वस्तूंचा पुनर्वापर करण्यात आला आहे. खराब झालेला माठ, पाण्याची टाकी, नारळाच्या झाडाचा बुंधा, कुलर, फ्रीज यांचा पुनर्वापर करुन त्यांनी बागेला नवा लूक दिला आहे. कमळ, लिली, मनी प्लांट, निशिगंध, परपल हर्ट, रातराणी, बेबी सनरोज, आंबे अशी अनेक देशी- विदेशी झाडे फुलविली आहेत. प्रत्येक झाडावर ते कोणत्या प्रकारचे आहे याची माहिती लिहिली आहे.

मागील तीन महिन्यांपासून बागेला भेट देण्याचा उपक्रम घेण्यात आला नव्हता. आॅनलाईन पद्धतीने बागेला भेट देण्याचे ठरले. दोनदा याचा सराव (ट्रायल) घेण्यात आला. सदस्यांनी देखील उत्साह दाखवत या आॅनलाईन उपक्रमात सहभाग घेतला. येत्या काळात आणखी चांगले उपक्रम घेणे व नव्या बागप्रेमींना सोबत घेण्याचा मानस आहे.- नारायण पाटील, ग्रुप अ‍ॅडमीन

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणagricultureशेतीdigitalडिजिटलWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप