पाटकर वस्तीत मित्रमंडळीकडून वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:26 IST2021-08-22T04:26:55+5:302021-08-22T04:26:55+5:30

कुरुल : जिल्हा परिषदेचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुल येथील पाटकर वस्ती प्राथमिक शाळा येथे राज्य क्रीडा ...

Tree planting by friends in Patkar area | पाटकर वस्तीत मित्रमंडळीकडून वृक्षारोपण

पाटकर वस्तीत मित्रमंडळीकडून वृक्षारोपण

कुरुल : जिल्हा परिषदेचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुल येथील पाटकर वस्ती प्राथमिक शाळा येथे राज्य क्रीडा परिषदेचे माजी सदस्य अण्णासाहेब पाटील मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करून, आनंद वृद्धिंगत केला. लिसुराम उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपा जिल्हा उद्योग विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष लिंगदेव निकम आणि कामती खुर्दचे माजी उपसरपंच विठ्ठल माळी यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

यावेळी अण्णासाहेब जाधव पाटील, मेजर लिंगदेव निकम, माजी उपसरपंच विठ्ठल माळी, गणेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ जाधव, तुकाराम शिंदे, प्रकाश जाधव, पांडुरंग माळी, जनहित शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत निकम, शरद गोरे, विकास जाधव, गणेश पाटील, सुनील जाधव, संताजी घोडके, सादिक मुलानी, बाळासाहेब शिंदे, शिवसंग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पाटील, शिवराज जाधव, आकाश चौगुले, साहिल तांबोळी, श्रीकांत लांडे, समर्थ जाधव, आकाश चौगुले, आदित्य चंदनशिवे, रितेश चंदनशिवे, रवि क्षीरसागर, नवनाथ गायकवाड, आकाश गायकवाड उपस्थित होते.

-----

फोटो : २१ पाटकर वस्ती

पाटकर वस्ती येथे वृक्षारोपण करताना अण्णासाहेब पाटील, लिंगदेव निकम, विठ्ठल माळी.

Web Title: Tree planting by friends in Patkar area