शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णावर ‘स्टेमी’ प्रकल्पाद्वारे होणार  उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 10:23 IST

हृदयविकार रूग्णांना मिळणार दिलासा; उपजिल्हा रूग्णालयातही मिळणार उपचार

ठळक मुद्देसार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्टेमी प्रकल्प सुरू करण्याबाबत सूचना उपजिल्हा रुग्णालयात या सुविधा देण्यात येणार आहेतहृदयरोगाचा झटका आल्यानंतर रुग्णावर त्वरित उपचार करून त्याची प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार

शीतलकुमार कांबळेसोलापूर : एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्यास त्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे असते. मात्र, गरजेच्या वेळेस असे उपचार मिळतातच असे नाही. ग्रामीण भागात हृदयविकाराचा झटका आल्यावर उपचार न झाल्याने अधिक अडचणी येतात. यावर उपाय म्हणून उपजिल्हा रुग्णालयात स्टेमी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याने उद्भवणाºया आजाराने अनेक जणांचा मृत्यू होतो. अशाप्रकारे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण राज्यामध्ये जास्त आहे. अशा रुग्णांना त्वरित उपचार मिळाल्यास होणाºया मृत्यूवर प्रतिबंध घालता येणे शक्य होते. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, यात सोलापूरचा देखील समावेश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार देऊन त्यांना जीवदान देण्यात यणार आहे. 

स्टेमी प्रकल्पामध्ये स्पोक व हब हे मॉडेल वापरण्यात येणार आहे. स्पोकमध्ये उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश असून, त्या ठिकाणी अतिदक्षता विभाग आणि हृदयविकारासंबंधी अतितत्काळ सेवा दिल्या जातात. अशा रुग्णालयांचा समावेश आहे.

सोलापुरातील उपजिल्हा रुग्णालयात देखील या सुविधा देण्यात येणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण आल्यावर त्याचा ईसीजी काढला जाईल आणि तो माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने क्लाऊड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून तज्ञांकडे पाठविला जाईल. औषधोपचाराबाबत दहा मिनिटांत मार्गदर्शन केले जाईल. 

स्पोक पद्धतीमध्ये रुग्णांचा ईसीजी करून हृदयविकाराचा झटका आला की नाही, याची तपासणी केली जाते. झटका आलेल्या रुग्णाला तत्काळ रक्ताची गुठळी पातळ करण्याचे औषध (थ्राँबोलिसिस) दिले जाईल. त्यानंतर त्या रुग्णाला हब येथे पुढच्या उपचारासाठी पाठविले जाणार आहे.

गोल्डन अवर म्हणजे काय?- बदलत्या जीवनशैलीमुळे हृदय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रुग्णांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे दिसताच, त्यानंतर दोन तासांचा कालावधी उपचारासाठी ‘गोल्डन अवर’ समजला जातो. कारण या काळात हृदयाला होणारा रक्तपुरवठा वेगाने खंडित होतो. त्यामुळे हृदय बंद पडण्याची शक्यता असते. रुग्ण दोन तासांत हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्यास तो वाचण्याची शक्यता अधिक असते. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णाच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात पोहोचायला सरासरी १० ते १२ तासांचा कालावधी लागत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्टेमी प्रकल्प सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयात या सुविधा देण्यात येणार आहेत. हृदयरोगाचा झटका आल्यानंतर रुग्णावर त्वरित उपचार करून त्याची प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यानंतर पुढील उपचारासाठी त्याला शहरातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. - डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्य