सोलापूर, पुणे ग्रामीणसह सांगली, सातारा, कोल्हापूरमधील २७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
By Appasaheb.patil | Updated: June 30, 2023 22:36 IST2023-06-30T22:36:39+5:302023-06-30T22:36:50+5:30
कोल्हापूर परिक्षेत्रामधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

सोलापूर, पुणे ग्रामीणसह सांगली, सातारा, कोल्हापूरमधील २७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
सोलापूर : कोल्हापूर परिक्षेत्रामधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या केल्याचा आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सहीने काढण्यात आले आहेत.
या बदल्यामध्ये सोलापूर ग्रामीण सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. विहित कालावधी पूर्ण केलेल्या २३, विनंतीनुसार ४ जणांची बदली करण्यात आली आहे. याशिवाय ५ पोलीस निरीक्षकांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अमान्य केली आहे. बदल्यामध्ये सोलापूर ग्रामीणचे तीन, कोल्हापूरचे आठ, साताराचे तीन, पुणे ग्रामीणचे सात, सांगलीचे पाच पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, संबंधित घटक प्रमुखांनी या बदली आदेशाची प्रत संबंधित पोलीस निरीक्षक यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे. शिवाय पर्यायी व बदलीवर येणाऱ्या पोलीस निरीक्षकांची वाट पाहू नये असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.