शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
2
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
3
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
4
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
5
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
6
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
7
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
8
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
9
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
10
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
11
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
12
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
13
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
14
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
15
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
16
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
18
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
19
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

युजर चार्जेसमुळे १० ते ३० रुपयांनी महागणार रेल्वे तिकीट

By appasaheb.patil | Updated: October 1, 2020 12:58 IST

केंद्रीय मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव; नोव्हेंबरपासून राज्यातील १० रेल्वे स्थानकांवर होणार वसूल

ठळक मुद्देप्रायोगिक तत्त्वावर देशातील महत्त्वाच्या ए १ श्रेणीतील स्थानकावर हा युजर चार्जेस वसूल करण्यात येणारमहाराष्ट्रातील सोलापूर, नागपूर, पुणे, कल्याण, दादर, ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनल या स्थानकांचा समावेश

सुजल पाटील

सोलापूर : रेल्वे स्थानकावर करण्यात येणाºया पुनर्विकास योजनेतील कामासाठी आता रेल्वे प्रवाशांकडून युजर चार्जेस वसूल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे़ नोव्हेंबरपासून राज्यातील १० रेल्वे स्थानकांवरून युजर चार्जेस वसूल करण्यात येणार आहेत़ त्याचा दर साधारण  १० ते ३० रुपयांपर्यंत असणार आहे़ रेल्वेने त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला असून मंजुरीनंतरच युजर चार्जेस वसुलीला सुरुवात होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

रेल्वे स्थानकावर विविध विकास कामे करणे अथवा प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वे मंत्रालय पुनर्विकास योजना राबवित आहे़ ही योजना आता खासगी कंपन्यांकडून चालविण्यात येणार आहे़ त्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने हा निधी जमा करण्यासाठी रेल्वे आता रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांसोबतच त्यांना सोडण्यासाठी आलेल्या व स्थानकावरून घेऊन जाण्यासाठी आलेल्या लोकांकडून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या माध्यमातून युजर चार्जेस वसूल करण्यात येणार आहे़ या चार्जेसमधून जमा झालेल्या पैशांतून  रेल्वे स्थानक, हॉटेल, मॉल्स, कार्यालयीन जागा, फूड प्लाझा, रेस्टॉरंट, रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

राज्यातील या रेल्वे स्थानकांचा असेल समावेशप्रायोगिक तत्त्वावर देशातील महत्त्वाच्या ए १ श्रेणीतील स्थानकावर हा युजर चार्जेस वसूल करण्यात येणार आहे़ यात महाराष्ट्रातील सोलापूर, नागपूर, पुणे, कल्याण, दादर, ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनल या स्थानकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

काय आहे युजर चार्जेस...भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जातो़ तसेच विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात करण्यात येतात़ त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून निधी दिला जातो; मात्र यापुढे रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे युजर चार्जेसमधून मिळालेल्या पैशातून करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार सुरू आहे़

असा असेल दऱ...युजर चार्जेसच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांकडून १० ते ३५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे़ एसी १ साठी ३० ते ३५ रुपये, एसी २ साठी २५ रुपये तर एसी ३ साठी २० रुपये असणार आहे़ पाहुण्यांना सोडण्यासाठी व घेऊन जाण्यासाठी आलेल्या लोकांकडून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या माध्यमातून युजर चार्जेस वसूल करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले़

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे