शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जमीन संपादित केली...शेतातून रेल्वे गेली.. फाटक्या खिशानिशी पाहिली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 12:24 IST

मोबदल्यासाठी रामहिंगणीतील शेतकºयाची व्यथा: दुहेरीकरण-कॅनॉलसाठी १४ वर्षांपूर्वी संपादन; दोन आॅक्टोबरला गांधीगिरी

ठळक मुद्देरामहिंगणीचे बाधित शेतकरी पांडुरंग चौगुले यांची़ पांडुरंग केराप्पा चौगुले यांची गट नंबर २२ ही  जमीन रामहिंगणी रेल्वे लाईनच्या जवळ आहेसन १९९० मध्ये त्यांची भीमा पाटबंधारे खात्याने कॅनॉलसाठी जमीन संपादित केली़ तशा नोटिसा पांडुरंग चौगुले यांना देण्यात आल्या

वडवळ : रेल्वे दुहेरीकरण अन् कॅनॉलसाठी जमीन संपादित केली. वर्षामागून वर्षे लोटली. आता हे १४ वे वर्ष  आहे; अद्याप मोबदला मिळाला नाही. वर्षानुवर्षे शासनदरबारी हेलपाटे मारुनही हाती काहीच लागले नाही.

आता ही व्यथा आहे रामहिंगणीचे बाधित शेतकरी पांडुरंग चौगुले यांची़ पांडुरंग केराप्पा चौगुले यांची गट नंबर २२ ही  जमीन रामहिंगणी रेल्वे लाईनच्या जवळ आहे. सन १९९० मध्ये त्यांची भीमा पाटबंधारे खात्याने कॅनॉलसाठी जमीन संपादित केली़ तशा नोटिसा पांडुरंग चौगुले यांना देण्यात आल्या.  मोबदला न दिल्याने २००६ मध्ये पांडुरंग चौगुले यांनी भूसंपादन या खात्याकडे अर्ज केला.  २०१६ साली तीन वेळा निवेदन दिले़ तेव्हा जमिनीचा गट गेल्याची नोंद नसल्यामुळे मोबदला देता येत नाही असे तोंडी सांगितले. त्यानंतर २००३- २००४ मध्ये पांडुरंग चौगुले यांची जमीन सोलापूर मध्य रेल्वेने दुहेरी रेल्वे करण्यासाठी संपादित केली. 

त्यावेळीही आजूबाजूच्या सर्व शेतकºयांना मोबदला मिळाला; मात्र चौगुलेंना वगळले. अर्ज, विनंत्या केल्या; मात्र रेल्वेने देखील तुमचा गट आम्ही आरक्षित केलेल्या जमिनीमध्ये भूसंपादन अधिकाºयांनी दाखवला नाही, त्यामुळे मोबदला देता येत नाही असे सांगितले. भूमी अभिलेख कार्यालयातून कागदपत्रे काढली असता त्यामध्ये रेल्वेसाठी आणि कॅनॉलसाठी जमीन आरक्षित केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक, डीआरएम सोलापूर यांच्याकडेही लेखी पाठपुरावा केला़ 

जनहित देणार न्यायरामहिंगणीचे शेतकरी पांडुरंग चौगुले यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून न्याय मिळवून देणारच, असे जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी  सांगितले 

माझ्या शेताच्या खालच्या आणि वरच्या भागातील शेतकºयांना लाभ मिळतो आणि फक्त मलाच कसे वगळले जाते? २००५ पासून मी अर्ज, विनंत्या करतोय. दखल कोणीच घेत नाही. त्यामुळे लालफितीच्या कारभाराला वैतागून मी कुटुंबासह बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारत आहे. -पांडुरंग चौगुले,शेतकरी, रामहिंगणी

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेagricultureशेतीFarmerशेतकरी