महुद येथे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:56 IST2021-01-13T04:56:29+5:302021-01-13T04:56:29+5:30

या पथसंचलनात पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्यासह पोलीस अधिकारी, ...

Traffic of police officers at Mahud | महुद येथे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथसंचलन

महुद येथे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथसंचलन

या पथसंचलनात पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड सहभागी झाले होते.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारीला होत असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी, मतदान शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावे, गावातील उपद्रवी लोकांवर जरब बसावी, यासाठी सांगोला पोलीस ठाण्यातर्फे महूद येथे पथसंचलन करण्यात आले. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम असणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

कोट :

ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या गैरमार्गाचा वापर होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे कोणतेही कृत्य अगर बाब निदर्शनास आल्यास त्यांची गय केली जाणार नाही.

- सूर्यकांत कोकणे, पोलीस निरीक्षक

फोटो ओळ :: सांगोला पोलीस ठाण्यातर्फे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महूद (ता. सांगोला) येथे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे सशस्त्र पथसंचलन केले.

Web Title: Traffic of police officers at Mahud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.