Maharashtra Election 2019 :पारंपरिक विरोधकांनी कंबर कसली; पक्ष बदलल्याने चुरस वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 06:24 AM2019-10-15T06:24:37+5:302019-10-15T06:33:52+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी बार्शी मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांप्रमाणे यंदा देखील सोपल-राऊत या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतच लढत होणार असली तरी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या वैराग भागातील निरंजन भूमकर यांच्या उमेदवारीने तुल्यबळ अशी तिरंगी लढत होणार हे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निश्चित झाले आहे़

Traditional opponents fighting; Changing parties increased the mood | Maharashtra Election 2019 :पारंपरिक विरोधकांनी कंबर कसली; पक्ष बदलल्याने चुरस वाढली

Maharashtra Election 2019 :पारंपरिक विरोधकांनी कंबर कसली; पक्ष बदलल्याने चुरस वाढली

Next

समीर इनामदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर: विधानसभा निवडणुकीसाठी बार्शी मतदारसंघात गेल्या चार निवडणुकांप्रमाणे यंदा देखील सोपल-राऊत या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतच लढत होणार असली तरी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या वैराग भागातील निरंजन भूमकर यांच्या उमेदवारीने तुल्यबळ अशी तिरंगी लढत होणार हे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर निश्चित झाले आहे़
मागील दोन निवडणुकांत सोपल, राऊत यांच्याशिवाय विश्वास बारबोले व राजेंद्र मिरगणे यांनी नशीब अजमावून पाहिले. मात्र त्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही़ राष्ट्रवादीचे नेते असलेले दिलीप सोपल हे यंदा शिवसेनेकडून बाण हातात घेऊन उभे आहेत़ भाजपमध्ये असलेल्या राजेंद्र राऊत यांना राजकीय अपरिहार्यता म्हणून ट्रॅक्टरवर बसून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यावा लागला तर राष्ट्रवादीमध्येच असलेल्या निरंजन भूमकर यांनी निवडणूक लढविणे निश्चित केले. याशिवाय मनसेचे नागनाथ चव्हाण, हिंदू महासभेकडून बबिता काळे, बसपाकडून कनिष्क शिंदे तर राजेंद्र राऊत यांच्यासह नऊ अपक्षही निवडणूक लढवत आहेत़

जमेच्या बाजू
सध्या राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या महायुतीची मिळालेली उमेदवारी, प्रचारासाठी मिळणाऱ्या मोठ्या नेत्यांच्या सभा, महायुतीतील भाजपचे राजेंद्र मिरगणे व शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांची असलेली साथ, दांडगा जनसंपर्क व राजकीय अनुभवग़ेल्या ३५ वर्षांपासून तालुक्यात आमदार आणि मंत्री म्हणून केलेले नेतृत्व, पाणीपुरवठा मंत्री असताना तालुक्यात केलेल्या पाणीपुरवठा योजना.
महायुतीची उमेदवारी मिळाली नसली तरी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांशी असलेले चांगले संबंध, नगरपालिका, बाजार समिती, पंचायत समिती व राज्य सरकारच्या सत्तेच्या माध्यमातून तालुक्यात केलेली विकासकामे, महायुतीची उमेदवारी मिळणार नाही हे गृहीत धरून केलेली निवडणुकीची तयारी, अपक्ष असतानाही मोठ्या प्रमाणात गटात होत असलेले इनकमिंग, विश्वासू कार्यकर्त्यांची तगडी फौज़
उणे बाजू
बाजार समिती कथित गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेले गुन्हे, कुमुदा-आर्यन ऊस बिल प्रकरण, मागील एक वर्षात कमी झालेला जनसंपर्क, मागील दोन-तीन वर्षांत बाजार समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांत झालेला पराभव, आजवर बाजार समिती, जिल्हा बँक आदी संस्थांत कार्यरत असलेल्या विश्वासू कार्यकर्त्यांचा कमी असलेला सहभाग़ राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी नसल्यामुळे पारंपरिक मतदार दुरावण्याचा धोका़
महायुतीची उमेदवारी मिळवण्यात आलेले अपयश, नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या विकासकामाच्या निमित्ताने शहरात तयार होत असलेला चिखल व धुळीमुळे हैराण असलेली जनता, पाणीपुरवठ्याचे न करता आलेले योग्य नियोजन, अपक्ष उमेदवारी असल्याने प्रचारासाठी स्टार प्रचारक आणता न येणे. ऐनवेळी सोपल यांनी केलेल्या महायुतीतील प्रवेशामुळे होणारी कोंडी सोडविता न येणे.

Web Title: Traditional opponents fighting; Changing parties increased the mood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.