चोरीची म्हैस विकत घेणारा व्यापारी झाला सहआरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:26 IST2021-09-05T04:26:38+5:302021-09-05T04:26:38+5:30

मंगळवेढा : तामदर्डी येथील ७० हजारांची चोरलेली म्हैस घेतल्याप्रकरणी पोलिसांनी इब्राहिम कुरेशी (वय २४, रा. मोहोळ) या व्यापाऱ्यास सहआरोपी ...

The trader who bought the stolen buffalo became a co-accused | चोरीची म्हैस विकत घेणारा व्यापारी झाला सहआरोपी

चोरीची म्हैस विकत घेणारा व्यापारी झाला सहआरोपी

मंगळवेढा : तामदर्डी येथील ७० हजारांची चोरलेली म्हैस घेतल्याप्रकरणी पोलिसांनी इब्राहिम कुरेशी (वय २४, रा. मोहोळ) या व्यापाऱ्यास सहआरोपी करून मंगळवेढा पोलिसांनी अटक केली.

तामदर्डी शिवारातून फिर्यादी सद्दाम तांबोळी (रा. बेगमपूर, ता. मोहोळ) यांच्या शेतातील गोठ्यातून म्हैस व रेडी २३ जूलै रोजी आरोपी कमाल वाघमारे व सचिन कोळी (रा. सिध्दापूर, ता. मंगळवेढा) यांनी चोरून नेली होती. या म्हशी मोहोळचे व्यापारी तथा आरोपी इब्राहिम कुरेशी याने विकत घेतल्या होत्या. म्हैस चोरून नेणाऱ्या वरील दोघा आरोपींना प्रकरणाचा तपास करणारे अमलदार दयानंद हेंबाडे यांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. या दरम्यान चौकशीत आरोपींनी त्या म्हशी मोहोळ येथील व्यापारी इब्राहिम कुरेशी याला विकल्याची कबुली दिली होती. पोलीस हवालदार दयानंद हेंबाडे व पोलीस नाईक शिवाजी पांढरे यांनी तत्काळ मोहोळ गाठून व्यापारी कुरेशी याला सहआरोपी करून शुक्रवारी अटक केली.

दरम्यान, या म्हशी चोरी प्रकरणातील आरोपी कमाल वाघमारे व सचिन कोळी या दोघांची पाेलीस काेठडी २ सप्टेंबर रोजी संपल्यानंतर त्या दोघांना सिध्दापूर येथील दोन म्हशी चोरी प्रकरणातील गुन्ह्यात वर्ग करण्यात आल्याचे हेंबाडे यांनी सांगितले.

Web Title: The trader who bought the stolen buffalo became a co-accused