सांगोल्यात वाळुची ट्रॅक्टर ट्राॅली पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:16+5:302021-04-28T04:24:16+5:30

सांगोला : चोरून वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली सांगोला पोलिसांनी गस्त घालत असताना पकडली. या कारवाईत ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक ...

A tractor-trolley of sand was caught in Sangola | सांगोल्यात वाळुची ट्रॅक्टर ट्राॅली पकडली

सांगोल्यात वाळुची ट्रॅक्टर ट्राॅली पकडली

सांगोला : चोरून वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली सांगोला पोलिसांनी गस्त घालत असताना पकडली. या कारवाईत ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक ब्रास वाळूसह जवळपास २ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यावेळी चालकाने तेथून पळ काढला.

ही कारवाई मंगळवारी सकाळी १०:३०च्या सुमारास सांगोला भोपळे रोड येथील डॉ.नागणे हास्पिटल समोर झाली. पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र जाधव, पोलीस नाईक पवार, पोलीस कॉन्स्टेबल अंकुशराव असे तिघेजण मंगळवारी सांगोला शहर हद्दीत गस्त घालत होते. वाळूने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली डॉ.नागणे हॉस्पिटलसमोर येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांचे हे पथक त्या ठिकाणी सापळा लावला. ट्रॅक्टर बाजूला उभा करण्यास सांगताच चालकाने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, त्याने गल्लीबोळातून पळ काढला. पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र नागनाथ जाधव यांनी ट्रॅक्‍टर चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title: A tractor-trolley of sand was caught in Sangola