शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

एकाच बुंध्यावर तोतापुरी, हापूस अन् केसर आंबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:15 IST

मार्डीच्या युवकाचा प्रयोग;  सेंद्रिय शेतीबरोबरच पशुपालन, शेळ्या, सशांचेही संगोपन

ठळक मुद्देमार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील अ‍ॅग्री डिप्लोमा करणाºया युवकाने आपल्या शेतातच अशा नवीन प्रयोगावर भर देऊन त्याच्या शेतीला मार्गदर्शन केंद्रच बनविलेस्वत:च्या आंब्याच्या बागेमध्ये एकाच आंब्याच्या बुंध्यावर हापूस, तोतापुरी अन् केसर या तीन वाणाचे कलम करून या तिन्ही वाणाचे तो उत्पादन घेत आहे. 

जगन्नाथ हुक्केरी 

सोलापूर : सर्वच क्षेत्रात सध्या नवनवीन प्रयोगावर भर देण्यात येत आहे. मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील अ‍ॅग्री डिप्लोमा करणाºया युवकाने आपल्या शेतातच अशा नवीन प्रयोगावर भर देऊन त्याच्या शेतीला मार्गदर्शन केंद्रच बनविले आहे. स्वत:च्या आंब्याच्या बागेमध्ये एकाच आंब्याच्या बुंध्यावर हापूस, तोतापुरी अन् केसर या तीन वाणाचे कलम करून या तिन्ही वाणाचे तो उत्पादन घेत आहे. लखन रामलिंग फसके (वय २२) असे त्या तरुण प्रयोगशील शेतकºयाचे नाव आहे.

वडिलोपार्जित शेतीत सुरुवातीला त्याने प्रयोग म्हणून पहिला प्रयत्न केला आहे. यात त्याला चांगले यश मिळत आहे. शिवाय बारमाही आंब्याची लागवड करून त्याचे वाण विकसित करण्याचा तो प्रयत्न करीत आहे. लखन फसके हा वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयात अ‍ॅग्री डिप्लोमा करीत असून, नवनवीन प्रयोगाचा ध्यास घेऊन आपली शेती विकसित करण्याचा त्याने प्रयत्न सुरू केला आहे. त्याला महाविद्यालयाच्या सचिवा अनिता ढोबळे यांच्यासह त्यांचे वडील रामलिंग, आई व आजी यांचीही मदत मिळत आहे. आंब्याबरोबरच पेरू, सागवान, नारळ, फळस, जांभूळ यासह भाजीपाला, कांदा, ज्वारी, गहू ही पारंपरिक पिकेही तो घेतो. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन, शेळी, ससे पालनही करतो. त्याच्याकडे रेडा, म्हशी, गायीही आहेत. यात जर्सीपासून ते गावरान, खिलार जातीच्या गायींचा समावेश आहे. 

अ‍ॅग्री कल्चरल डिप्लोमा तो नोकरी करण्यासाठी नव्हे स्वत:ची शेती विकसित करण्याबरोबरच इतर शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी करीत आहे. सेंद्रिय शेतीवर भर देत तो स्लरी म्हणजे जीवामृत स्वत: बनवत असून, जीवामृत बनविण्याची साधनेही त्याने विकसित केली आहेत. त्याच्या  शेतात ४0 आंब्याची झाडे असून, यातील प्रत्येक झाडावर तो नवनवीन प्रयोग  करीत आहे. एकाच झाडावर दोन  किंवा तीन व त्यापेक्षा जास्त कलम करून एकाच झाडाच्या माध्यमातून विविध आंब्याच्या जातीचे उत्पादन तो घेत आहे. त्याने विकसित केलेले बारमाही आंबे सोलापूरच्या बाजारात आकर्षण ठरत आहे. 

प्रयोगशीलतेबरोबरच कल्पकताहीमार्डीतील लखन फसके हा प्रयोगशील विद्यार्थी आहे. तो त्याच्या शेतात नेहमीच विविध प्रयोग करून शेतीतील नवीन प्रयोग जगाच्या शेतकºयांसमोर मांडत आहे. त्याच्याकडे प्रयोगशीलतेबरोबरच कल्पकताही आहे. यामुळे तो भविष्यात एक प्रयोगशील शेतकरी म्हणून जगासमोर येईल, असे श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या सचिवा अनिता ढोबळे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी