लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:23 IST2021-04-08T04:23:09+5:302021-04-08T04:23:09+5:30

कुर्डूवाडी : दूध घरी देण्याच्या बहाण्याने एका २२ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा प्रकार माढा तालुक्यातील एका ...

Torture of a young woman by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

कुर्डूवाडी : दूध घरी देण्याच्या बहाण्याने एका २२ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा प्रकार माढा तालुक्यातील एका गावात घडला. याबाबत कुर्डूवाडी पोलिसांनी गहिनीनाथ नरोटे व दत्तात्रय नरोटे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २२ वर्षीय तरुणीच्या घरी दूध देण्यासाठी गहिनीनाथ नरोटे यायचा. यातून त्याने ओळख वाढवली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. संबंधित आरोपीने ६ ऑक्टोबर २०२० ते २१ ऑक्टोबर २०२० काळात तो तिला घेऊन खोली करून राहिला. तिथे एकत्र असताना लग्न करण्याचे आश्वासन देत अत्याचार केला. २१ ऑक्टोबर २०२० रोजी त्या तरुणीने सर्व प्रकार आईला सांगितला. दरम्यान, आरोपीने तरुणीवर संशय व्यक्त करीत शिवीगाळ केली. ही बाब आरोपीचे वडील दत्तात्रय नरोटे यांना समजली. ३० डिसेंबर २०२० रोजी बाप लेक तरुणीच्या घरासमोर येऊन तुला बघतोच अशी धमकी दिली. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे करीत आहेत.

Web Title: Torture of a young woman by showing the lure of marriage