लाेहाेकरे गुरुजींच्या जीवनावरील दोन कवितासंग्रहांचे उद्या प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:56+5:302021-09-25T04:21:56+5:30

तसेच प्रमाेद पाटील प्रकाशित परिस्पर्श या स्मरणिकेचेही प्रकाशन होणार आहे. हा सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ...

Tomorrow's publication of two collections of poems on the life of Lahaekare Guruji | लाेहाेकरे गुरुजींच्या जीवनावरील दोन कवितासंग्रहांचे उद्या प्रकाशन

लाेहाेकरे गुरुजींच्या जीवनावरील दोन कवितासंग्रहांचे उद्या प्रकाशन

तसेच प्रमाेद पाटील प्रकाशित परिस्पर्श या स्मरणिकेचेही प्रकाशन होणार आहे. हा सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व माजी आमदार निर्मलाताई ठाेकळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी कर्मवीर लाेहाेकरे गुरुजींच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशक अरुण जाखडे, सेवानिवृत्त उपसंचालक शाहू पाटाेळे, ज्येष्ठ साहित्यिक याेगीराज वाघमारे, प्राचार्या डाॅ. नसीम पठाण, कवी माधव पवार, राजेंद्र भोसले, मारुती कटकधाेंड, वंदना कुलकर्णी, माधव गरड, राजेंद्र अत्रे, काकासाहेब शिंदे, प्रा.डाॅ. सुनील विभुते, ह.भ.प. माऊली महाराज, मेडसिंगा, प्रा.डाॅ. दत्तात्रय जमाले आदी साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपाध्यक्ष विश्वनाथ काकडे, प्रभारी सचिव पंडितराव लाेहाेकरे, प्राचार्य अप्पासाहेब कुतवळ, मुख्याध्यापक मनाेज भड, इंद्रजित पाटील उपस्थित होते.

...........

फोटो : २४लोहोकरे गुरुजी

Web Title: Tomorrow's publication of two collections of poems on the life of Lahaekare Guruji