शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता 
3
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
4
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
5
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
6
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
7
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
8
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
9
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
10
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
11
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
12
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
13
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
14
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
15
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
16
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
17
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
18
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
19
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
20
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?

सावळेश्वर, वरवडे, तामलवाडी, येडशी टोलनाक्यांवरील टोल वाढला

By appasaheb.patil | Updated: April 2, 2019 18:40 IST

१ एप्रिलपासून झाली अंमलबजावणी : सावळेश्वर, वरवडे, तामलवाडी, येडशी टोलनाक्यांवर दर आकारणी

ठळक मुद्दे आता वाहनधारकांना ५ ते १५ रुपये अधिकचा टोल द्यावा लागणारवाढत्या वाहनांच्या किमती व वाढते इंधनाचे दर यामुळे वाहनधारक त्रस्त सोलापूर -पुणे हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यामुळे सोलापूर ते पुणे हे सहा ते सात तासांचे अंतर आता वाहनधारक तीन ते साडेतीन तासांतच पूर्ण करू लागले

सोलापूर : आय़ एल़ अ‍ॅण्ड एफ़एस., पुणे-सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व आयआरबीने आता कंत्राटातील नियमांचा आधार घेत वाढीव दराची १ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील तामलवाडी, वरवडे तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी व येडशी टोलनाक्यांवर आता वाहनधारकांना ५ ते १५ रुपये अधिकचा टोल देऊन प्रवास करावा लागणार आहे़ या वाढीव टोलमुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने पुणे-सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व आय़ एल़ अ‍ॅण्ड एफ़ एस. ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड या दोन कंपन्यांची स्वत:ची गुंतवणूक करून सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग तयार केला. त्यानंतर गुंतवणूक केलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी  वरवडे (ता़ माढा) व सावळेश्वर (ता़ मोहोळ) या दोन्ही ठिकाणी टोलनाका उभारला.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील सोलापूर ते येडशीपर्यंतचा महामार्ग बनविला. त्या बदल्यात आय़आऱबी, सोलापूर व एऩएच़ए़आय़ पी़आय़यु. यांनी तामलवाडी व येडशी येथे टोलनाका उभा केला़ सोलापूर ते येडशी हा मार्ग ७० ते ८० टक्के पूर्ण झाल्याची माहिती ट्रकचालकाने दिली. सोलापूर -पुणे हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यामुळे सोलापूर ते पुणे हे सहा ते सात तासांचे अंतर आता वाहनधारक तीन ते साडेतीन तासांतच पूर्ण करू लागले आहेत़ त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वरवडे, सावळेश्वरची मुदत २०३१ तर येडशीची २०४४ पर्यंत- सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग तयार करणाºया पुणे सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व आय़ एल़ अ‍ॅण्ड एफ़एस. या कंपनीने भारत सरकारच्या रस्ते व विकास मंत्रालयासोबत ३० सप्टेंबर २००९ रोजी करार केला आहे. हा करार १९ आॅगस्ट २०३१ रोजी संपणार आहे़ तोपर्यंत टोल वसुली ही सुरूच राहणार असल्याची माहिती टोल कंपनीचे प्रमुख प्रकाशकुमार लाल दास यांनी दिली़ - सोलापूर-येडशी हा महामार्ग पूर्ण केलेल्या आय़ आऱ बी. कंपनीने भारत सरकारच्या रस्ते व विकास मंत्रालयासोबत ३ मार्च २०१४ रोजी करार केला आहे़ या करारानुसार या मार्गावर टोल सुरू करण्यात आला. ही टोल वसुली २७ मार्च २०४४ पर्यंत असणार आहे.

वाढत्या वाहनांच्या किमती व वाढते इंधनाचे दर यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत़ त्यात आता टोलच्या वाढीव दराने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे़ भाडे परवडत नसल्याने बहुतांश गाड्या चार ते सहा दिवस सोलापुरातच थांबून राहतात़ टोलवाढीमुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे़- फारुख शेख,ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक

टॅग्स :Solapurसोलापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाकाroad transportरस्ते वाहतूक