आज रस्त्यावर, उद्या सरकार व न्यायदेवतेच्या दारात बसू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST2021-06-25T04:16:53+5:302021-06-25T04:16:53+5:30

‘आज रस्त्यावर बसलोय... उद्या सरकार व न्यायदेवतेच्या दारात जाऊन बसायला मागे सरणार नाही... तुम्ही जर आम्हाला सरणावर न्यायची तयारी ...

Today on the streets, tomorrow at the door of government and justice | आज रस्त्यावर, उद्या सरकार व न्यायदेवतेच्या दारात बसू

आज रस्त्यावर, उद्या सरकार व न्यायदेवतेच्या दारात बसू

‘आज रस्त्यावर बसलोय... उद्या सरकार व न्यायदेवतेच्या दारात जाऊन बसायला मागे सरणार नाही... तुम्ही जर आम्हाला सरणावर न्यायची तयारी करत असाल, तर आम्ही हलगीनादाने त्याचे स्वागतच करू... पण, मागे सरणार नाही... सरकार जर पाठपुरावा करायला मागे पडत असेल, तर आम्ही तो पूर्णत्वास नेऊ,’ अशा घोषणा देत रास्ता रोको आंदोलन पार पडले. समता परिषद तालुकाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, अतिष देवमारे यांच्या नेतृत्वाखाली अ. भा. महात्मा फुले समता परिषद व समस्त ओबीसी समाजबांधवांच्यावतीने हे आंदोलन पार पडले.

यावेळी समता परिषद जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे, नगरसेवक अमोल डोके, बजरंग देवमारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा साधना राऊत, नगरसेवक संजय निंबाळकर, इब्राहिम बोहरी, रिपाइं शहराध्यक्ष संतोष पवार, अनिल अभंगराव, अरुणभाऊ कोळी, बाबा चव्हाण, सचिन देवमारे, उमेश सासवडकर, दत्ता देवमारे, अमोल माळी, ज्ञानेश्वर बनसोडे, मनोज फुले, सचिन गोडसे, वैभव गाडेकर, अजिंक्य देवमारे, सागर नवले, बाळासाहेब देवमारे, मसु राऊत, दशरथ माळी, शाहू यादव, युवराज सातपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Today on the streets, tomorrow at the door of government and justice