शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
4
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
5
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
6
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
7
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
8
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
9
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
10
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
11
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
12
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
13
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
14
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
15
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
16
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
17
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
18
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
19
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

आजपासून सोलापुरात लक्ष महादीपोत्सव, रोज दोन लाख दिवे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:18 AM

ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला महादीपोत्सव कर्णिकनगर येथील स्वातंत्र्यसैनिक नगरातील मैदानावर सोमवारपासून सुरू होत आहे.

ठळक मुद्देभव्य शिवमंदिराची प्रतिकृती उभी करण्यात आली महादीपोत्सव कर्णिकनगर येथील स्वातंत्र्यसैनिक नगरातील मैदानावरदररोज दोन लाख दीप या ठिकाणी लावण्यात येणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला महादीपोत्सव कर्णिकनगर येथील स्वातंत्र्यसैनिक नगरातील मैदानावर सोमवारपासून सुरू होत आहे. सहा दिवस चालणाºया या सोहळ्यात भव्य शिवमंदिराची प्रतिकृती उभी करण्यात आली असून उद्घाटन तेलंगणाचे जलसंपदामंत्री टी. हरीष राव यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली़विविध धार्मिक सोहळ्यांसाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. त्या अनुषंगाने एक भव्यदिव्य धार्मिक सोहळा साजरा करण्याच्या उद्देशाने हा महादीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ओम चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक मूर्तीकार राजू गुंडला यांनी हैदराबाद येथील दीपोत्सव सजावट करण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातही असा सोहळा करण्याची कल्पना सुचली. यातून ही कल्पना साकारली. यामध्ये ४०० ते ६०० फूट लांबी-रुंदी असणारे मंदिर उभारण्यात आले आहे. हे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. रविवारी हे काम पूर्ण झाले असून सोमवारपासून हा महोत्सव सुरू होणार आहे. दररोज दोन लाख दीप या ठिकाणी लावण्यात येणार असून सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत हा कार्यक्रम असणार आहे. या पत्रकार परिषदेस ट्रस्टचे संस्थापक राजू गुंडला, अध्यक्ष रविकांत दलसिंगे, उपाध्यक्ष सदानंद पिस्कार, सचिव विजय महिंद्रकर, हरिदास बुटला, प्रवीण मुटकिरी आदी उपस्थित होते.-----------------------------धार्मिक कार्यक्रम आणि प्रवचनया महोत्सवात सहा दिवस दररोज कल्याणोत्सव (पालखी)चा कार्यक्रम होणार आहे. ३० आॅक्टोबर - गणपती कल्याणोत्सव. प्रवचन - श्री शिवाचार्य जयसिद्धेश्वर स्वामीजी, डॉ. श्री शिवाचार्य मल्लिकार्जुन स्वामी, ३१ आॅक्टोबर - विठ्ठल-रुक्मिणी कल्याणोत्सव, प्रवचन - माता शिवानंद सरस्वती (विजयवाडा), आंध्रप्रदेश, १ नोव्हेंबर - लक्ष्मीनारायण कल्याणोत्सव, प्रवचन - सुधाकर इंगळे महाराज, २ नोव्हेंबर - सीताराम कल्याणोत्सव - प्रवचन - डॉ. शिवाचार्य मल्लिकार्जुन महास्वामी, ३ नोव्हेंबर - बालाजी - पद्मावती लक्ष्मी कल्याणोत्सव, प्रवचन - पवनजी परदेशी, ४ नोव्हेंबर - शिव-पार्वती कल्याणोत्सव, प्रवचन - जगद्गुरू श्री चंद्रशेखर स्वामी (काशी पीठ)-------------------------असे असणार मंदिर- २००० चौरस फुटावर उभे राहणार मंदिर - ४०० फूट रुंद, ६०० फूट लांब - भोवती ४० फूट उंच डोंगर - ४५ फूट उंच लिंग आणि शिवमूर्ती- ८ बाय १२ फुटाचा नंदी - २५ फूट उंच शिवलिंग - डावीकडे आणि उजवीकडे मिळून १३६ छोटी मंदिरे - उजवीकडच्या मंदिरात ६८ लिंगांची स्थापना - डावीकडील मंदिरात सर्व देवदेवतांची स्थापना - दिवे लावण्यासाठी ४ बाय ८ फूट साईजचे ४०० टेबल - प्रत्येक टेबलवर एक असे ४०० लिंग - गुहेसारख्या तीन प्रवेशद्वारावर १० फुटी उंच सहा हत्ती