शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

By काशिनाथ वाघमारे | Updated: June 26, 2023 22:12 IST

माहेरातून संताप व्यक्त : निमगावमधील घटना

सोलापूर : माहेराहून टीव्हीसाठी पैसे घेऊन यावे म्हणून सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून माढा तालुक्यात निमगाव (टें, ता. माढा) येथे एका २४ वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर माहेरच्या लोकांनी चक्क सासरच्या दारातच अंत्यसंस्कार करून संताप व्यक्त केला.

प्राजक्ता रोशनकुमार चट्टे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी मयत प्राजक्ताची आई सविता दत्तात्रेय लोंढे (रा. पिंपळनेर, ता.माढा) हिने फिर्याद दिली. याप्रकरणात टेंभुर्णी पोलिसांनी पती व सासूस अटक केली आहे.पोलीस सूत्राकडील माहितीनुसार मयत प्राजक्ताचे लग्न १५ एप्रिल २०२० रोजी निमगाव (टें) येथील रोशनकुमार चट्टे यांच्याबरोबर झाले होते. लग्न झाल्यानंतर तीन वर्षांपासून पती रोशनकुमार, सासरे नारायण चट्टे व सासू कौशल्या चट्टे हे तिघे प्राजक्तास माहेरहून टीव्ही घेऊन ये, चारचाकी गाडी घेण्यासाठी लाख रुपये आण म्हणून छळ करत होते. 

१७ जून २०२३ रोजी सासरे नारायण चट्टे यांनी विनयभंग केला. यावरून झालेल्या भांडणात प्राजक्ताने १८ जून रोजी सकाळी घरातच विष प्राशन केले. तिच्यावर अकलूज येथे उपचार सुरू असताना २६ जून रोजी प्राजक्ताचा मृत्यू झाला.  टेंभुर्णी पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पती रोशनकुमार चट्टे व सासू कौशल्या चट्टे या दोघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गिरीष जोग करीत आहेत.

गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह घेतला नाही

या घटनेनंतर प्राजक्ताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवून देण्यात आला. सोमवारी दुपारी १२.३० वाजता मृतदेह निमगावमध्ये आला मात्र नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिला. सासरच्या लोकांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. दुपारी २.३० वाजे दरम्यान गुन्हा दाखल झाला अन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर प्राजक्ताच्या मृतदेहावर निमगाव येथे सासरी दारातच अंत्यसंस्कार करण्यात करुन नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.  

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस