टायर फुटून कार गटारीत पडली; गरोदर महिलेसह चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:18 IST2021-05-29T04:18:13+5:302021-05-29T04:18:13+5:30

सांगवी येथील मौलाली शेख (वय २२), ममुला शेख (वय ६५), परवीन शेख (वय ३८), गरोदर महिला तब्बू ...

The tire burst and the car fell into the gutter; Four injured, including a pregnant woman | टायर फुटून कार गटारीत पडली; गरोदर महिलेसह चौघे जखमी

टायर फुटून कार गटारीत पडली; गरोदर महिलेसह चौघे जखमी

सांगवी येथील मौलाली शेख (वय २२), ममुला शेख (वय ६५), परवीन शेख (वय ३८), गरोदर महिला तब्बू शेख (वय २२), असे एकाच कुटुंबातील चौघे अक्कलकोट येथील हॉस्पिटलमध्ये सकाळी तपासणीसाठी गेले होते. गावी परत जात असताना कोळीबेटजवळील सिद्धे यांच्या शेताजवळ येताच कारचे समोरचे चालकांच्या बाजूचे टायर अचानकपणे फुटले. तेव्हा कार कोलांटी घेत बाजूच्या गटारीत जाऊन पडली.

प्रत्यक्षदर्शी प्रवीण बाबर, महमूद बिचकुते यांच्यासह जवळील शेतकरी लोकांनी धावत येऊन बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर पुन्हा अक्कलकोट येथे पाठवून तपासणी केली.सुदैवाने गरोदर महिलेसह कोणालाच मोठी इजा झाली नसल्याचे डॉक्टर यांनी सांगितले. जखमींना मलमपट्टी करून औषधोपचार करुन सोडून दिले.

----

फोटो २८ अक्कलकोट कार

ओळ; सांगवी (ता. अक्कलकोट) येथे अचानकपणे टायर फुटून कार पटली होऊन गटारीत पडलेल्याचे दिसत आहे.

Web Title: The tire burst and the car fell into the gutter; Four injured, including a pregnant woman