शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

टिपरची मोटारसायकलला जोराची धडक; एक ठार, दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 14:16 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सांगोला : भरधाव टिपरने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री ११:१५ च्या सुमारास जुनोनी- कोळा रोडवरील आलदर पेट्रोल पंपासमोर घडला.

श्रीमंत अर्जुन जाधव रा.पंढरपुर असे मृत दुचाकीस्वारांचे  नाव आहे तर सुरेश मल्हारी महानवर (रा.सोनके ता.पंढरपूर) व रघुनाथ पांडुरंग माडकर (रा. करगणी ता. आटपाडी) अशी जखमींची नावे आहेत.

सोनके (ता.पंढरपूर) येथील सुरेश मल्हारी महारनवर, श्रीमंत अर्जुन जाधव व करगणी ता.आटपाडी येथील मित्र रघुनाथ पांडुरंग माडकर असे तिघे जण मिळून खरसुंडी ता. आटपाडी येथे कलर कामासाठी गेले होते. तेथील काम संपल्यामुळे पुन्हा तिघेजण दुसरे काम बघण्यासाठी एम एच- १३-क्यू ०६६१ या दुचाकीवरून खरसुंडी येथून (जुनोनी ता.सांगोला) येथे  मंगळवारी २८ रोजी सायंकाळी ७:३०च्या सुमारास आले होते. तेथील काम पाहून पुन्हा त्याच दुचाकीवरुन रात्री १०-४५ च्या सुमारास जुनोनीकडून कोळे मार्गे खरसुंडीकडे जात असताना आलदर पेट्रोल पंपासमोर भरधाव येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.

अपघातात श्रीमंत जाधव (पंढरपुर) यांच्या डोक्यास कपाळावर जोराचा मार लागून जागीच ठार झाला तर सुरेश महारनवर याच्या उजव्या हाताची तीन बोटे मोडून  दोन्ही पायास हातास मार लागला . मित्र रघुनाथ माडकर यांच्या दोन्ही पायाला हातास पाठीला मुक्का मार लागून जखमी झाला. याबाबत, सुरेश मल्हारी महारनवर (रा.सोनके ता. पंढरपूर) यांनी अज्ञात टिपर चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसsangole-acसांगोला