शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:29 IST

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार, मनरेगा, सिंचन विहिरी आदी कामे चांगली झाली आहेत. मात्र यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील एकूण ९१ मंडलापैकी ६८ मंडलात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊसजिल्ह्यात यावर्षी अवघा ३८ टक्के पाऊस झालावैज्ञानिक निकषांच्या आधारावर आपली पाहणी सुरू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार, मनरेगा, सिंचन विहिरी आदी कामे चांगली झाली आहेत. मात्र यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अवघा ३८ टक्के पाऊस झाला आहे. आगामी काळात टंचाईची परिस्थिती उद्भवू शकते याचा विचार करून शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करण्याच्या सूचना देत जिल्ह्यातील विकासाला गती देवून दोन महिन्यात उर्वरीत विकास कामे पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.

सोलापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकपाणी व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्री  फडणवीस यांनी आज बहुउद्देशीय सभागृहात घेतला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, खासदार शरद बनसोडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूरचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील  उपस्थित होते.

या बैठकीत मुंबई येथून मुख्य सचिव डी.के.जैन यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात यावर्षी अवघा ३८ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ९१ मंडलापैकी ६८ मंडलात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तुलना करता ही स्थिती सन २०१५ सालाशी साधर्म्य असणारी आहे. दुष्काळाच्या संदर्भात केंद्र शासनाने २०१६ मध्ये काही वैज्ञानिक निकष घालून दिले आहेत. यामध्ये कमी पर्जन्यमानाबरोबरच दोन पावसातील खंडीत अंतराचा समावेश आहे. तसेच किमान १० गावात पीक कापणीचे प्रयोग करून त्यांचे विश्लेषण करून टंचाई घोषीत करण्याबाबत निर्णय देण्यात येणार आहे. या वैज्ञानिक निकषांच्या आधारावर आपली पाहणी सुरू असून त्याचे अहवाल आल्यानंतरच याबाबतचा योग्य निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणी