दुकानाच्या जागेवरून तिघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:26 IST2021-09-06T04:26:50+5:302021-09-06T04:26:50+5:30

अक्कलकोट : चपळगाव येथे दर्ग्याच्या जागेतील कोल्ड्रिंक काढ म्हणत सात जणांनी काठीने मारहाण करुन तिघांना जखमी केले. ४ सप्टेंबर ...

Three were beaten from the shop premises | दुकानाच्या जागेवरून तिघांना मारहाण

दुकानाच्या जागेवरून तिघांना मारहाण

अक्कलकोट : चपळगाव येथे दर्ग्याच्या जागेतील कोल्ड्रिंक काढ म्हणत सात जणांनी काठीने मारहाण करुन तिघांना जखमी केले. ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत दस्तगीर सैफन शेख (रा.चपळगाव, ता. अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी शाकीर पटेल, नासिर पटेल, खलील पटेल, युनुस पटेल, रफिक जमादार, आलिम पटेल, अबुजर पटेल (सर्व रा. चपळगाव, ता.अक्कलकोट) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीस कोल्ड्रिंक्सचे दुकान हे देवाच्या दर्ग्याच्या जागेत आहे, ते दुकान काढ, नाहीतर त्या जागेचे महिन्याला भाडे दे म्हणत जमलेल्या आरोपींनी फिर्यादीस व जखमी साक्षीदार यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण करून जखमी केले. इतर साक्षीदार सोडविण्यास आले असता त्यांनादेखील मारहाण करून फिर्यादीच्या दुकानातील सामानाची मोडतोड केली. या घटनेत फिर्यादी स्वतः व कासिम शेख, असलम शेख हे तिघेजण जखमी झाले. अधिक तपास पोलीस हवालदार वाळके करीत आहेत.

Web Title: Three were beaten from the shop premises