नऊ ब्रास वाळूसह तीन वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:23 IST2021-04-09T04:23:50+5:302021-04-09T04:23:50+5:30

८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता गुद्देवाडी भीमा नदीतून चोरून वाळू उपसा करीत होते. याबाबत पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. ...

Three vehicles with nine brass sands seized | नऊ ब्रास वाळूसह तीन वाहने जप्त

नऊ ब्रास वाळूसह तीन वाहने जप्त

८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता गुद्देवाडी भीमा नदीतून चोरून वाळू उपसा करीत होते. याबाबत पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यावरून सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी धाड टाकली. असता एक मालट्रक, दोन टेम्पो असे तीन वाहने पकडून त्यामधील ९ ब्रास वाळू जप्त केली. यामध्ये एकूण २६ लाख ९० हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस नाईक हरिदास पांढरे यांनी फिर्याद दिली आहे. सर्व गाड्या विना क्रमांकाच्या आहेत. या घटनेत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून त्यापैकी महातेश बगले व सिद्धाराम पाटील दोघे रा टाकली ता. दक्षिण सोलापूर यांना अटक केली आहे. उर्वरित दोघे जण फरार आहेत. अधिक तपास पोलीस नाईक उपासे हे करीत आहेत.

Web Title: Three vehicles with nine brass sands seized