शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवाना घेणाºया मिळकतदारांना महापालिकेतर्फे मिळणार मोफत तीन झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:49 IST

सोलापुरातील अभिनव उपक्रम; पहिल्या पाच मिळकतदारांना होणार लाभ

ठळक मुद्देमिळकतदारांसोबतच बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांनाही प्रत्येकी दोन झाडे लावण्याचे फर्मान सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांनी काढलेबांधकाम विभागात २८ कर्मचारी आणि अधिकारी आहेत. यातील बहुतांश कर्मचाºयांनी आपल्या घरासमोर झाडे लावली

राकेश कदम

सोलापूर : महापालिकेचा बांधकाम परवाना मिळविणाºया पहिल्या पाच मिळकतदारांना सोलापूर महानगरपालिकेकडून मोफत तीन झाडे मिळणार आहेत. पावसाळा होईपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यातून शहरात किमान दहा हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांनी दिली. 

राज्य शासनाने वृक्ष जोपासना हीच निसर्गाची उपासना या योजनेंतर्गत शहरी भागात वृक्ष लागवडीचा भरीव कार्यक्रम हाती घेतला आहे. महापालिकेने शहरात ३० हजार झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार कामही सुरू झाले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने आपल्या स्तरावर लोकांना वृक्ष लागवडीस प्रवृत्त करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बांधकाम परवाना घेणाºया मिळकतदारांना प्लॉटच्या क्षेत्रनिहाय झाडे लावण्याचे बंधन घालण्यात आले.

झाडे जगली तरच वापर परवाना मिळेल, असे बजावण्यात आले आहे. त्यानुसार अनेक लोक झाडे वापर परवान्याच्या फाईलसोबत वृक्ष संवर्धनाचे फोटो जोडत आहेत. याशिवाय बांधकाम परवाना विभागाने नवा उपक्रम हाती घेतला आहे. या विभागातून दररोज किमान १० ते १५ जणांना बांधकाम परवाना दिला जातो. यातील पहिल्या पाच जणांना प्रत्येकी तीन झाडे मोफत देण्यात येणार आहेत. शहरातील काही विकासकांनी महापालिकेला ५० ते १०० झाडे मोफत देण्याची तयारी दर्शविली आहे. ही झाडे मिळकतदारांना देण्यात येतील. बांधकाम सुरू असताना ही झाडे जगवायची. वापर परवाना घेताना या वृक्षांचे संवर्धन होत असल्याचे फोटोही जोडायला हवे, असे बंधन घालण्यात आले आहे. 

अधिकारी आणि कर्मचाºयांना केली सक्ती - मिळकतदारांसोबतच बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांनाही प्रत्येकी दोन झाडे लावण्याचे फर्मान सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांनी काढले आहे. बांधकाम विभागात २८ कर्मचारी आणि अधिकारी आहेत. यातील बहुतांश कर्मचाºयांनी आपल्या घरासमोर झाडे लावली आहेत. काही कर्मचारी भाड्याने राहत आहेत. त्यांनी आपल्या घरासमोरील रस्ता अथवा मोकळ्या जागेत झाडे लावावीत, असे सूचविण्यात आले आहे. 

वृक्षाअभावी पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. आपण आपल्या स्तरावर वृक्ष लागवडीची चळवळ रुजवणे गरजेचे आहे. बांधकाम परवाना विभागाच्या आवाहनाला मिळकतदार चांगला प्रतिसाद देत आहेत़ वापर परवाना घेण्यापूर्वी फाईलला वृक्ष संवर्धन करीत असल्याचे फोटो जोडले जात आहे. बांधकाम सुरू करण्यापूर्वी मोफत झाडे दिली तर त्यांचा उत्साह आणखी वाढेल, असे आम्हाला वाटते. आमच्या कर्मचाºयांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. - रामचंद्र पेंटर, सहायक अभियंता, मनपा. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाenvironmentपर्यावरणRainपाऊस