मारहाणीत तिघेजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:22 IST2020-12-31T04:22:32+5:302020-12-31T04:22:32+5:30

संगेवाडी येथील सचिन दिघे व समाधान पवार हे दोघेजण शेजारीशेजारी राहतात. बुधवारी सकाळी सचिन दिघे दुचाकीवरून घराकडे जात असताना ...

Three people were injured in the beating | मारहाणीत तिघेजण जखमी

मारहाणीत तिघेजण जखमी

संगेवाडी येथील सचिन दिघे व समाधान पवार हे दोघेजण शेजारीशेजारी राहतात. बुधवारी सकाळी सचिन दिघे दुचाकीवरून घराकडे जात असताना समाधान पवार ट्रॅक्टरमधून जाता-जाता त्याच्याकडे बघून शिवीगाळ करू लागला. म्हणून सचिन दिघे यांनी त्यास थांबवून तू मला शिव्या का दिल्या, याचा जाब विचारला. यावेळी समाधान पवार याने ट्रॅक्टरमधून उतरून मी तुला शिव्या देणार, तुला काय करायचे ते कर असे म्हणून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. तोपर्यंत सुधीर दिघे दुचाकीवरून तेथे आला असता त्याने तू माझ्या भावास का मारत आहे, असे बोलून सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी समाधान पवार याने त्यालाही मारहाण केली. तर समाधान पवार व चुलत भाऊ बालाजी पवार ट्रॅक्टरमधून शेतात जात असताना सचिन दिघे व सुरेश दिघे यांनी दुचाकीवरून येऊन तू आमच्याकडे का पाहतोस, तुझी लई दादागिरी झाली आहे, तुला बघतोच, तुझी नोकरी घालवतो असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून हाताने, लाथाबुक्यानी मारहाण करून जखमी केले. याबाबत सचिन दिघे व समाधान पवार (रा. संगेवाडी) यांनी सांगोला पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Three people were injured in the beating