शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

सोलापुरातील यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीचा करार तीन संघटनांना मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 09:59 IST

सोलापूर : एकोणीस महिन्यांपासून रखडलेला यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीचा करार अखेर मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत करण्यात आला. १०० कार्डास दहा ...

ठळक मुद्दे१०० कार्डास दहा पैसे वाढले, महिन्याकाठी ८०० ते हजार रुपयांची वेतनवाढ- यंत्रमाग कामगारांना प्रति १०० कार्डास १० पैसे वेतनवाढ- यंत्रमाग उद्योगातील इतर कामगारांना कमीत कमी दरमहा ५०० रुपये वेतनवाढ- ही वेतनवाढ किमान वेतनाच्या आधीन राहून द्यावी.- ही वेतनवाढ २६ फेब्रुवारीपासून लागू करावी.

सोलापूर : एकोणीस महिन्यांपासून रखडलेला यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीचा करार अखेर मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत करण्यात आला. १०० कार्डास दहा पैसे वाढविण्याचा निर्णय कामगार संघटना आणि यंत्रमागधारक संघाच्या पदाधिकाºयांनी घेतला. तीन कामगार संघटनांनी नवा करार मान्य केला. लालबावटाने मात्र या करारास विरोध करून संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.

२०१६ साली शेवटचा वेतन करार झाला होता. तो २०१७ साली संपला. यानंतर पुढे एकोणीस महिने वेतनवाढीचा करारच झाला नाही. २०१८ साली नव्याने करार करण्यासाठी संघटनांनी प्रयत्न केला, परंतु भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत यंत्रमाग कामगारांना पीएफ लागू करण्याचा आदेश दिल्यामुळे कधी नव्हे कारखानदारांनी बेमुदत बंद पुकारला. या गोंधळात वेतनवाढीचा करार राहून गेला.

२०१९ साली मजुरीवाढीसाठी कामगार संघटनांनी पुन्हा आंदोलन सुरू केले. मनसेप्रणित कामगार संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्तांकडे यासाठी वारंवार निवेदन आणि आंदोलन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन वेतनवाढीच्या सूचना खुद्द जिल्हाधिकाºयांनी दिल्या होत्या. अखेर या प्रश्नावर मंगळवारी तोडगा निघाला. मनसेप्रणित यंत्रमाग संघटना, कामगार सेना आणि भारतीय कामगार संघटना या तिन्ही संघटनेचे पदाधिकारी आणि यंत्रमागधारक संघाचे पदाधिकारी यांच्यात यंत्रमागधारक संघात झालेल्या बैठकीत वेतनवाढीचा नवा करार करण्यात आला.

१०० कार्डास १० पैसे अशी वेतनवाढ करण्यात आली आहे. साधारण दररोज ३० ते ३५ रुपये आणि महिन्याकाठी ८०० ते हजार रुपये मजुरीत वाढ होणार आहे. त्याचबरोबर जॉब प्रोसेसिंग म्हणजे जॉबर, मुनीम, घटी काटा करणाºया कामगारांना मासिक किमान ५०० रुपये वेतनवाढ करण्याचा निर्णय या कराराद्वारे घेण्यात आला आहे.

या बैठकीस यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, अंबादास बिंगी, मल्लिकार्जुन कमटम, नारायण आडकी, मनसे कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीधर गुडेली, विठ्ठल बोडा, नागनाथ केदारी, सदानंद जडल यांच्यासह कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि कारखानदार उपस्थित होते.

लाल बावटाचा विरोध; संपावर ठाम- लालबावटा यंत्रमाग कामगार संघटनेने हा करार अमान्य केला असून सर्व कामगारांना विश्वासात न घेता यंत्रमागधारक संघाच्या   पदाधिकाºयांनी मुद्दाम हा करार केला आहे. तो सिटूला मान्य नाही.  यंत्रमाग कामगारांना किमान ५० टक्के मजुरीवाढ मिळाली पाहिजे, या भूमिकेवर आम्ही ठाम असून या मागणीसाठी २८ फेब्रुवारीपासून बेमुदत  संप पुकारण्यात येणार असल्याचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांंगितले आहे.

तीन कामगार संघटनांनी एकत्र येऊन हा करार मान्य केलेला आहे. करारात ठरल्याप्रमाणे मजुरीवाढ सर्वच कारखानदार देतील. गेल्यावेळीही तीनच संघटनांनी हा करार मान्य केला होता. - पेंटप्पा गड्डमअध्यक्ष, यंत्रमागधारक संघ 

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योग