लग्नातील खर्चापोटी तीन लाख; रुपये दे म्हणत पत्नीचा छळ
By रूपेश हेळवे | Updated: April 29, 2023 19:01 IST2023-04-29T19:00:48+5:302023-04-29T19:01:42+5:30
फिर्यादी सिमरन यांचे अनिस मकानदार याच्याशी २०२२ मध्ये विवाह झाला.

लग्नातील खर्चापोटी तीन लाख; रुपये दे म्हणत पत्नीचा छळ
सोलापूर : लग्नात खर्च झाल्याच्या बदल्यात माहेरून तीन लाख रुपये घेऊन ये म्हणत छळ केल्याप्रकरणी पतीसह सात जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सिमरन अनिल मकानदार (वय २२, रा. मोमीननगर, मुळेगाव रोड) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सिमरन यांचे अनिस मकानदार याच्याशी २०२२ मध्ये विवाह झाला. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी फिर्यादीला त्रास देऊ लागले. शिवाय लग्न खर्चापोटी ३ लाख रुपये घेऊन ये म्हणत फिर्यादीला मारहाण करत होते. शिवाय त्यांना उपाशी ठेवून शिवीगाळ दमदाटी करत होते. अशा आशयाची फिर्याद सिमरन यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती अनिस मकानदार, सासू रेश्मा, सावत्र सासू शबाना, सासरे बंदू भाईफ, आजी सासू शन्नोबी, दीर दाऊद, सलीम ( सर्व रा. सादेपूर मंद्रूप) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोना कांबळे करत आहेत.