शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विषारी औषध प्यायल्याने तीन जर्शी गायींचा तडफडून मृत्यू; सोलापुरातील घटना

By appasaheb.patil | Updated: August 18, 2023 14:11 IST

दरम्यान, फिर्यादी देशमुख यांनी तातडीने खासगी डॉक्टर बोंगे यांना बोलाविले होते, डॉक्टरांनी जनावरांची तपासणी केली असता एक गाय मृत झाल्याचे सांगितले, त्यानंतर उपचार चालू असताना दोन गायींचा मृत्यू झाला.

सोलापूर : विषारी औषध प्यायल्याने तीन जर्शी गायींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचीघटना बीबीदारफळ (ता. उ. सोलापूर) येथे १८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळच्या सुमारास पोलिसात नोंद झाली. संजय जयसिंग देशमुख (वय ५४) यानी दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक संजयसिंग देशमुख (वय ३०), तुषार दीपक देशमुख (वय ३२) या दोघांविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी संजय देशमुख हे शेतातील द्राक्ष बाग काढून टाकत होते. याचवेळी चारण्यासाठी बागेत चार जर्शी गायी बांधल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी हे शेतात बांधलेल्या गायी सोडून गोठ्याकडे जात असताना शेतातील बांधावर भाऊ दीपक व तुषार यानी प्लास्टिक बॅरलमध्ये कोणतेतरी विषारी औषध पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते, याच बॅरलमधील विषारी औषध प्यायल्याने गायी चक्कर येऊन खाली पडल्या.दरम्यान, फिर्यादी देशमुख यांनी तातडीने खासगी डॉक्टर बोंगे यांना बोलाविले होते, डॉक्टरांनी जनावरांची तपासणी केली असता एक गाय मृत झाल्याचे सांगितले, त्यानंतर उपचार चालू असताना दोन गायींचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सोलापूर तालुका पेालिस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल महिंद्रकर करीत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीcowगायPoliceपोलिस