पुतण्याची मारहाण, चुलत्यासह तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST2021-05-15T04:20:58+5:302021-05-15T04:20:58+5:30
कमलापूर येथील भगवान रामचंद्र पांढरे हे जनावरे चारत असताना पुतण्या दत्तात्रय पांढरे याच्या शेतात गेली. तेव्हा चुलते जनावरांना हाकलत ...

पुतण्याची मारहाण, चुलत्यासह तिघे जखमी
कमलापूर येथील भगवान रामचंद्र पांढरे हे जनावरे चारत असताना पुतण्या दत्तात्रय पांढरे याच्या शेतात गेली. तेव्हा चुलते जनावरांना हाकलत असताना पुतण्याने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर बाळासाहेब सदाशिव पांढरे, शिरमा सदाशिव पांढरे, वैशाली दत्तात्रय पांढरे हे चौघे भगवान पांढरे यांच्या घरासमोर येत धुळा कुठे गेला आहे, असे म्हणून दत्तात्रय पांढरे याने भगवान पांढरे यांचा मुलगा धुळा यास मारहाण करुन जखमी केले तर बाळासाहेब पांढरे हा हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असताना भगवान पांढरे यांची पत्नी सिंधुबाई पांढरे सोडवण्यासाठी आली असता तिलाही मारहाण केली. याबाबत भगवान पांढरे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दत्तात्रय सदाशिव पांढरे, बाळासाहेब सदाशिव पांढरे, शिरमा सदाशिव पांढरे, वैशाली दत्तात्रय पांढरे सर्व रा. कमलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.